Share

कौतुकास्पद! छोट्याशा हेअर सलूनपासून IPL पर्यंत केला खडतर प्रवास, कुलदीप सेनची अनटोल्ड स्टोरी वाचून व्हाल थक्क

आयपीएलमध्ये काल झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने लखनऊ सुपर जायंट्सवर थरारक विजय मिळवला आहे. राजस्थान रॉयल्सच्या विजयात एका वेगवान गोलंदाजाने महत्वाची भूमिका बजावली आहे. त्या वेगवान गोलंदाजाचे नाव कुलदीप सेन असे आहे. कुलदीप सेनने(Kuldeep Sen) शेवटच्या षटकात अप्रतिम गोलंदाजी करत राजस्थान रॉयल्स संघाला विजय मिळवून दिला आहे.(rajsthan royals kuldeep sen untold story)

महान गोलंदाज लसिथ मलिंगाने देखील कुलदीप सेनचे कौतुक केले आहे. सध्या राजस्थान रॉयल्स संघाचा वेगवान गोलंदाज कुलदीप सेनची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. वेगवान गोलंदाज कुलदीप सेन हा मूळचा मध्यप्रदेशातील रेवा जिल्ह्यातील रहिवाशी आहे. कुलदीप सेनची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्याच्या वडिलांचे एक छोटेसे सलूनचे दुकान आहे.

या दुकानातून मिळणाऱ्या पैशातून ते घरखर्च भागवायचे. वेगवान गोलंदाज कुलदीप सेनच्या वडिलांचे नाव रामपाल सेन असे आहे. तर आईचे नाव गीता सेन असे आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असली तरीही रामपालने मुलाला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. आठव्या वर्षापासून कुलदीप सेन क्रिकेट खेळू लागला.

हळूहळू कुलदीपच्या खेळामध्ये प्रगती होऊ लागली. काही जिल्हास्तरीय सामन्यांमध्ये कुलदीप सेनने उत्तम कामगिरी केली. कुलदीपचा खेळ पाहून रेवा क्रिकेट अकादमीने त्याला मोफत प्रवेश दिला. त्यानंतर कुलदीपचा मध्यप्रदेश संघात समावेश करण्यात आला. रणजी करंडक स्पर्धेत मध्यप्रदेश संघाकडून खेळताना कुलदीपने १४ सामन्यांमध्ये ४३ विकेट घेतल्या आहेत.

आयपीएलने कुलदीपच्या या कामगिरीची दखल घेतली आणि २०२२ च्या मेगा लिलावात त्याचा समावेश केला. राजस्थान रॉयल्सने २० लाख रुपयांच्या मूळ किंमतीत कुलदीप सेनला संघात सामील करून घेतले. रविवारी झालेल्या लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात कुलदीपला पहिल्यांदाच संधी मिळाली.

या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सला शेवटच्या ६ चेंडूत विजयासाठी १५ धावांची गरज होती. त्यावेळी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने कुलदीप सेनकडे चेंडू सोपवला. कुलदीप सेनने या संधीचे सोने करत आपल्या गोलंदाजीने राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून दिला आहे. या सामन्यानंतर महान गोलंदाज लसिथ मलिंगाने कुलदीप सेनचे उभे राहून कौतुक केले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
PHOTO: कोणत्याही हिरोइनपेक्षा कमी नाहीये अमरीश पुरी यांची मुलगी, दिसते खुपच सुंदर, करते ‘हे’ काम
काका-पुतण्यात खडाजंगी! मनसेचं आदित्य ठाकरेंना खुलं आव्हान; ‘मातोश्रीत बसलेल्यांनी…’
30 वर्षात खुपच बदलली आहे सनम बेवफामधील सलमान खानची हिरोइन, फोटो पाहून बसणार नाही विश्वास

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now