शेतकऱ्याच्या पाचही मुली झाल्या अधिकारी, पाचवी नंतर शाळेत जाण्यासाठी पैसे नव्हते तर घरीच घेतले शिक्षण

राजस्थानमच्या हनुमानगढमधील भैरूसरी हे एक छोटे गाव आहे. येथील तीन बहिणींची राजस्थान प्रशासकीय सेवेत (आरएएस) निवड झाली आहे, ज्या की शेतकरी कुटुंबातील आहेत आणि विशेष म्हणजे या तिघीही पाचवीनंतर शाळेत गेल्या नाहीत.

त्यांच्या गावात शाळा नव्हती आणि शेतकरी वडील सहदेव यांच्याकडे तीन मुलींना एका मोठ्या शाळेत शिकवण्याइतके पैसेही नव्हते. म्हणून, बहिणींनी एकमेकांना मदत केली आणि घरीच राहून नेट आणि जेआरएफ पर्यंतचा अभ्यास पूर्ण केला.

सहदेव सहारन यांना पाच मुली असून पाचही सरकारी सेवेत आहेत. त्यापैकी एक सध्या झुंझुनू येथे बीडीओ आहे आणि एक सहकारी सेवेत आहे. आता तीन बहिणींची आरएएसमध्ये निवड झाली आहे.

जे कुटुंब मुलींना ओझे समजतात त्यांच्यासाठीही हे कुटुंब प्रेरणादायी आहे. मी माझ्या मुलींना अभ्यासापासून कधीही रोखले नाही, असे सहारन म्हणतात. जूलै महिन्यात जेव्हा या परीक्षेचा निकाल लागला, तेव्हा आरएएसमध्ये तीन बहिणींची एकत्र निवड झाली, त्यामुळे सहारन कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

राजस्थान प्रशासकीय सेवा (आरएएस) २०१८ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे, ज्यामध्ये हनुमानगढ येथील रहिवासी अंशु, रितू आणि सुमन या तीन बहिणींची नावे आहेत, म्हणजेच तिघींचीही आरएएसमध्ये निवड झाली आहे.

त्यांच्या आईवडिलांच्या मेहनतीचे फळ आहे की आज त्यांच्या मुली या टप्प्यावर पोहचू शकल्या आहेत, असे त्या बहिणींनी म्हटले आहे. मोठी बहीण रोमा यांनी सांगितले की त्यांच्या पालकांनाही मुलींकडून समाजात खूप टोमणे ऐकायला मिळाले.

अभ्यास आणि लेखन करून ते काय करतील, परंतु त्यांनी याची पर्वा केली नाही, त्यांनी आम्हाला कठोर परिश्रम आणि समर्पणाने शिकवले. त्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्हीही कोणतीही कसर सोडली नाही आणि आज हे स्थान मिळवले आहे, असे रोमाने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

VIDEO: रितेश देशमुख आणि जिम ट्रेनर जिममध्येच भिडले; रितेश हात जोडून म्हणाला, मला जाऊ दे….
५० वर्षीय माधूरीच्या फोटोशुटने चाहत्यांना लावलय वेड! जान्हवी, सारा यापुढे फिक्या पडतील
“अहो पाटील, तुम्ही काय अजित पवार खिशात ठेवण्याची भाषा करताय? तुमचे १०५ अजितदादांनी गुंडाळलेत”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.