Share

बावरे प्रेम हे.., ४२ वर्षांचा शिक्षकावर फिदा झाली २० वर्षांची विद्यार्थीनी, लग्न केलं अन्..

teacher-student-love-rajstanh-bhratpur.j

राजस्थानमधून(Rajasthan) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक विद्यार्थिनी(Student) आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या शिक्षकाच्या(Teacher) प्रेमात पडली आहे. या विद्यार्थिनीने घरातून पळून जाऊन शिक्षकाशी लग्न केलं आहे. राजस्थानमधील भरतपूरमध्ये २० वर्षीय विद्यार्थिनी ४० वर्षीय शिक्षकाच्या प्रेमात पडली आणि त्या दोघांनी घरातून पळून जाऊन अजमेरमध्ये कोर्टात लग्न केले आहे.(rajsthan 20 year student marriage with 40 year teacher)

बुधवारी दोघे भरतपूरच्या एसडीएम कार्यालयात हजर झाले. त्या ठिकाणी दोघांनीही आपला जबाब नोंदवला आहे. या जबाबात विद्यार्थिनीने सांगितले की, “मी स्वतःच्या इच्छेने घरातून पळून जाऊन लग्न केले. मी आता घरी जाणार नसून पतीसोबत राहणार आहे”, असे त्या विद्यार्थिनीने सांगितले. यादरम्यान विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी तिला घरी येण्यासाठी समजावून सांगितले. पण त्या विद्यार्थिनीने नकार दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, ४० वर्षीय सतवीर भरतपूरच्या जनुठार गावातील सरस्वती आयटीआय कॉलेजमध्ये इंग्रजी विषय शिकवायचे. शिवानीचे वडील २०१६ मध्ये सतवीरच्या संपर्कात आले. शिवानीच्या वडिलांनी सतवीरकडे मुलीला इंग्रजी विषय शिकवण्याची मागणी केली. सतवीर यांनी ती मागणी मान्य केली.

सतवीर शिवानीला इंग्रजी विषय शिकवण्यासाठी इचेरा गावातून जनुठार येथे रोज जात होते. वर्षभरापूर्वी त्यांनी कॉलेजमध्ये शिकवणे बंद केले, पण शिवानीच्या घरी शिकवायला ते येत राहिले. यादरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. सतवीर आणि शिवानी यांचे प्रेमप्रकरण वाढत गेल्यावर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

यानंतर शिवानी जानेवारी महिन्यात भरतपूरला मावशीच्या घरी राहायला आली. या दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर सतवीर भरतपूरला पोहोचला आणि २१ जानेवारीला दोघींनी मावशीच्या घरातून पळ काढला आणि अजमेर कोर्टात लग्न केले. शिवानी बेपत्ता झाल्यानंतर मावशीच्या घरच्यांनी तिचा खूप शोध घेतला, मात्र ती सापडली नाही.

यानंतर शिवानीच्या काकांनी मथुरा गेट पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. गुरुवारी सतवीर आणि शिवानी भरतपूर एसडीएम कार्यालयात पोहोचले. याठिकाणी दोघांनीही आपण स्वतःच्या इच्छेने पळून गेलो होतो आणि आता आम्हाला एकत्र राहायचे आहे, असा जबाब नोंदवला. यादरम्यान मुलीचे कुटुंबीयही या ठिकाणी पोहोचले. त्यांनी आपल्या मुलीला सोबत जाण्यासाठी खूप समजावले, पण तिने घरी येण्यासाठी नकार दिला.

महत्वाच्या बातम्या :-
एकेकाळी आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ स्टार खेळाडूला कोणीच नाही दिला भाव, कारकीर्द संपुष्टात
सागर कारंडे ‘चला हवा येऊ द्या’ शोमधून पडला बाहेर? धक्कादायक खुलाश्याने मनोरंजन क्षेत्रात खळबळ
हिजाब वादावर आता जावेद अख्तर यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, मुलींच्या एका छोटाशा गटाला..

इतर

Join WhatsApp

Join Now