‘तिरंगा’मध्ये नाना पाटेकर ऐवजी दिसले असते रजनीकांत; पण ‘या’ कारणामुळे दिला नकार

यात काही शंका नाही की, राजकूमार बॉलीवूडमधले सुपरस्टार होते. त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे घर केले होते. त्यांचा आवाज आणि दमदार अभिनय प्रेक्षकांना खुप आवडायचा. आजही लोकं त्यांचे चित्रपट आवडीने पाहत असतात.

राजकूमार त्यांच्या कामामूळे नेहमीच सर्वांची मने जिंकून घ्यायची. पण त्यांचा स्वभाव मात्र अनेकांसाठी अडचण होता. त्यांच्या विचित्र स्वभावामूळे अनेकदा लोकं त्यांच्यासोबत काम करायला घाबरायचे. राजकूमार कधी काय बोलतील याचा नेम नव्हता. ते अनेकदा लोकांचा अपमान करायचे.

त्यांचा हाच स्वभाव निर्माते आणि दिग्दर्शकांसाठी अडचण होता. अनेक कलाकारांनी राजकूमारमूळे मोठ्या मोठ्या चित्रपटांना नकार दिला होता. असाच काही किस्सा रजनिकांतचा देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया राजकूमारमूळे रजनीकांतने कोणत्या सिनेमाला नकार दिला होता.

राजकूमार ज्यावेळी सुपरस्टार होते. त्याच वेळी रजनीकांतने देखील इंडस्ट्रीमध्ये चांगली ओळख बनवली होती. १९९३ राजकूमार यांचा ‘तिरंगा’ हा चित्रपट रिलीज झाला आणि सुपरहिट झाला. या चित्रपटात राजकूमारसोबत नाना पाटेकर मुख्य भुमिकेत दिसले होते. दोघांची जोडी चांगलीच हिट ठरली होती.

पण खुप कमी लोकांना माहीती असेल की, या चित्रपटात सुरुवातीला राजकूमारसोबत रजनीकांत काम करणार होते. पण त्यांनी राजकूमारच्या भीतीने चित्रपटाला नकार दिला आणि ही भुमिका रजनीकांतकडे गेली. चित्रपटाचे दिग्दर्शक मेहूल कुमारने स्वत या गोष्टीचा खुलासा केला होता.

मेहूल कुमारने सांगितले की, मी या भुमिकेची ऑफर रजनीकांतला दिली होती. त्यांना भुमिका आवडली आणि त्यांनी चित्रपटाला होकार दिला. त्यानंतर त्यांनी विचारले की, ब्रिगेडियर सुर्यदेव सिंहची भुमिका कोण करत आहे. मी राजकूमारचे नाव घेतल्यानंतर त्यांचा चेहरा उतरला.

रजनीकांत म्हणाले की, ‘तुम्ही भुमिकेला माझेच खरे नाव शिवाजीराव दिले आहे. ही गोष्ट खुप चांगली आहे. मला भुमिकाही आवडली. पण राजकूमारसोबत कसे काम करु? शुटींग दरम्यान काही अडचणी निर्माण झाल्या तर? त्यांचा स्वभाव तर सर्वांनाच माहीती आहे’.

मला चित्रपटात कोणतीही अडचण नको. पण शुटींग सुरु झाल्यावर सेटवर काही प्रॉब्लेम झाला तर मग मी काय करु? त्यामूळे रजनीकांतने हात जोडले आणि चित्रपटाला नकार दिला. रजनीकांतने चित्रपटाला नकार दिल्यानंतर मेहूलने नाना पाटेकरला या भुमिकेसाठी तयार केले.

महत्वाच्या बातम्या –

हेमामालिनीसोबत किसिंग सीन करणार होते फिरोज खान; पण ‘या’ व्यक्तीने केला कडाडून विरोध
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा विवाह झाला संपन्न; पहा लग्नाचे फोटो
नेहाने धुपीयाने मुलीला स्तनपान करतानाचा ‘तो’ फोटो केला शेअर अन् ट्रोलर्सची चांगलीच जिरवली
धर्मेंद्रने अमिताभ बच्चनबद्दल केले धक्कादायक खुलासे; म्हणाले शोलेच्या शुटींग वेळी तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.