अभिनेते राजकूमार यांनी त्यांच्या कुत्र्याला विचारुन हिट चित्रपटाला नाकारले होते

अभिनेते राजकूमार त्यांच्या बिंधास्त स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांच्या वेगळ्या स्वभावामूळे सगळ्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या नावाचे चर्चे होते. त्यांनी बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

एवढे स्टारडम असूनही राजकूमार कधीच चित्रपटांच्या मागे पळत नव्हते. दिग्दर्शक मात्र चित्रपटांच्या स्क्रिप्ट घेऊन त्यांच्या मागे फिरत होते. कोणत्या दिग्दर्शकाचा चित्रपट करायचा हे मात्र राजकूमार स्वत: ठरवायचे.

चित्रपट साईन करण्यापूर्वी राजकूमार मात्र अनेक वेगवेगळ्या गोष्टी करायचे. एका दिग्दर्शकाचा चेहरा आवडला नव्हता. म्हणून त्यांनी त्या दिग्दर्शकाच्या चित्रपटाला नकार दिला होता. असे एकदा नाही अनेकदा झाले होते. राजकूमार खुप विचित्र कारणं सांगून राजकूमार चित्रपटाला नकार द्यायचे.

१९६८ साली रामानंद सागर ‘ऑंखे’ चित्रपटावर काम करत होते. या चित्रपटात राजकूमार यांनी मुख्य भुमिका करावी. अशी त्यांची इच्छा होती. या अगोदर देखील राजकूमार यांनी रामानंद सागर यांच्या ‘जिंदगी और पैगाम’सारख्या चित्रपटामध्ये काम केले होते.

त्यामूळे दोघांमध्ये खुप चांगली मैत्री होती. त्यांनी ऑंखे चित्रपटासाठी त्यांनी राजकूमारला दहा लाखाची
ऑफर दिली होती. त्यांना वाटत होते की राजकूमार चित्रपटाला होकार देतील. चित्रपटाबद्दल बोलण्यासाठी रामानंद सागर राजकूमारच्या घरी गेले. त्यावेळी राजकूमार घरीच होते.

रामानंद आले त्यावेळी राजकूमार सिगार पित होते. त्यांनी रामानंद सागरचे चांगले स्वागत केले. त्यांचा चांगला पाहूणचार केला. त्यांना खायला दिले. सुरुवातीला त्यांनी चित्रपटावर थोडा वेळ चर्चा केली. रामानंद सागर यांनी राजकूमारला सांगितले, माझी इच्छा आहे की, तुम्ही या चित्रपटामध्ये काम करावे.

हे ऐकल्यानंतर राजकूमार थोडा गप्प बसले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कुत्र्याला बोलावले. राजकूमारचा कुत्रा आला आणि तो त्यांच्या शेजारी बसला. राजकूमार यांनी त्यांच्या कुत्र्याला विचारले की, रामानंद सागर एका चित्रपटाची ऑफर घेऊन आले आहेत. तुला काय वाटते मी काय वाटते मी हा चित्रपट करावा का?

राजकूमार यांचा कुत्रा शांत बसला. थोडा वेळ शांत बसल्यानंतर त्याने भुंकायला सुरुवात केली. त्या भुंकण्याला कुत्र्याचा नकार समजून राजकूमार यांनी चित्रपटाला नकार दिला. ही गोष्ट बघून रामानंद सागर यांना धक्का बसला होता. त्यांनी राजकूमारला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण फायदा झाला नाही.

शेवटी रामानंद सागर यांनी धर्मेंद्रला घेऊन ऑंखे चित्रपट बनवला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट झाला होता. त्या चित्रपटाचे यश पाहून राजकूमार यांना दुख झाले असेल हे नक्की. पण त्याच्याबद्दल त्यांनी कोणालाही सांगितले नाही.

महत्वाच्या बातम्या –

अभिज्ञा भावेचा रेट्रो लुक ठरला सोशल मिडीयावर चर्चेचा विषय; पहा फोटो

‘आशिका बनाया आपने’ फेम तनूश्री दत्ताचा हॉट अंदाज; इंग्रजी गाण्यावर डान्स करताना व्हिडीओ झाला व्हायरल

संजू बाबाला किस करायला घाबरत होती बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री; मग वडीलांनी दिली ट्रेनिंग

आई झाल्यानंतर ‘तारक मेहता’मधील रिटा रिपोटरने पोस्ट केले बिकनीतील फोटो; फोटोसोबत दिला खास संदेश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.