मालाडमध्ये फांदी पडून हेल्मेटचे झाले दोन तुकडे अन् तरुणाचा मृत्यु; थरारक व्हिडिओ आला समोर

एकीकडे राज्यभरात कोरोनाच्या संकट असाताना आता आणखी नव्या संकटाने मुंबई कोकणात ठाण मांडले आहे ते म्हणजे तोक्ते चक्रीवादळ. या चक्रीवादळामुळे आतापर्यंत अनेक घरांचे मोठमोठ्या इमारतींचे नुकसान झाले आहे.

तसेच या चक्रीवादळामुळे अनेक मोठमोठी झाडेही पडली आहे. या दुर्घटनांमध्ये काही नागरीकही जखमी झाले आहे. सध्या काही व्हिडियो पण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आले आहे.

मालाडमध्ये अंगावर झाड कोसळल्याने एक तरुणाचा मृत्यु झाला आहे. विक्रोळीत पण अशीच घटना घडली होती, मात्र त्या घटनेत एक महिला थोडक्यात बचावली होती. मात्र मालाडमध्ये झालेल्या घटनेमध्ये तरुणाला आपले प्राण गमवावे लागले आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे.

या घटनेत मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव राजकुमार जैसस्वाल असे नाव होते. तो पाऊसामुळे थांबलेला होता, पण काही वेळाने त्याने गाडी सुरु केली आणि निघायला लागला. तेवढ्यात एक फांदी त्याच्या डोक्यात पडली. त्यामुळे त्याच्या हेल्मेटचे दोन तुकडे झाले आहे.

फांदी थेट डोक्यावर पडली होती, त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्यावर तब्बल १३ तास शस्त्रक्रिया चालली पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला आहे.

राजकुमारचा किराणा मालाचा व्यवसाय होता. तसेच त्याचे आई-वडिल अंध असून पत्नी आणि मुलं हे उत्तर प्रदेशमध्ये राहत होते. कुटुंबाची सर्व जबाबदारी राजकुमारवरच होती, मात्र आता त्याचेच निधन झाल्यामुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

महत्वाच्या बातम्या-

आता पाकिस्तान आणि चीनला फुटणार घाम, भारताला मिळणार ‘हे’ धोकादायक शस्त्र
छत्रपतींचे वंशज असलेल्या खासदार संभाजीराजेंच्या मागे मराठा समाज का उभा आहे?
‘या’ बॉलरच्या बॉलिंगला घाबरत होते मोठमोठे बॅट्समन, आज त्याला दोन वेळचे जेवणही मिळणे झाले अवघड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.