उलट उत्तर देणाऱ्या मिथून चक्रवर्तीचा राजकुमारने असा अपमान केला की, त्यांनी रडायला केली होती सुरुवात

अभिनेते राजकुमार त्यांच्या विचित्र स्वभावासाठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये खुप प्रसिद्ध आहेत. त्यांच्या स्वभावापासून कोणताही स्टार वाचू शकला नाही. त्यांच्याबद्दल सर्वांना माहीती होते. त्यामुळे कलाकार त्यांच्यापासून दुर पळायचे.

पण बॉलीवूडमधल्या एका कलाकाराने राजकुमार यांच्या बोलण्याला उलट उत्तर दिले होते. त्याचा परिणाम त्याला भोगावा लागला होता. एवढेच नाही तर तो कलाकार राजकुमारमूळे सगळ्या स्टाफसमोर रडला होता. जाणून घेऊया कोण होता तो स्टार?

त्या कलाकाराचे नाव होते मिथून चक्रवर्ती. राजकुमारमूळे मिथून सेटवर रडत होते. ही घटना आहे ‘गलियों का बादशाह’ चित्रपटाच्या सेटवरील. चित्रपटात राजकुमार आणि हेमा मालिनी मुख्य भुमिकेत होते. तर मिथून आणि स्मिता पाटील सेकंड लीड म्हणून काम करत होते.

ज्यावेळी राजकुमार यांना समजले की, मिथून देखील चित्रपटामध्ये काम करत आहेत. त्यावेळी ते चिडले. कारण त्यांची इच्छा होती की, चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत सिनियर अभिनेत्याने काम करावे. त्यांनी ही इच्छा बोलून दाखवली.

राजकुमार म्हणाले की, ‘मला वाटलं होते की, चित्रपटामध्ये कोणीतरी मोठा कलाकार असेल. हा कोण नवीन अभिनेता काम करत आहे. याला चित्रपटात घेण्यापेक्षा मला एकट्याला घेऊन चित्रपट करायचा होता’. हे ऐकल्यानंतर मिथून चिडले आणि त्यांनी राजकुमारला उलट उत्तर दिले.

ते म्हणाले की, ‘मी नवीन अभिनेता नाही. मी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि प्रसिध्द चेहरा आहे. पुढे जाऊन मी स्टार होणार आहे’. हे ऐकल्यानंतर राजकुमार यांनी हसायला सुरुवात केली. हे पाहून मिथूनला अजून राग आला.

राजकुमार फक्त हसण्यावर न थांबता मिथूनचा अपमान करत पुढे म्हणाले की, ‘तु स्टार होणे तर शक्य नाही. पण तुला चित्रपटामध्ये छोट्या मोठ्या भुमिका हव्या असतील. तर मला सांग मी तुझी मदत करेल’.हे बोलून राजकुमार हसत हसत निघून गेले.

एवढा सगळं ऐकल्यानंतर मिथून चक्रवर्ती भावूक झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि त्यांनी तिथेच रडायला सुरुवात केली. त्या दिवसानंतर मिथूनने कधीच राजकुमारसमोर तोंड उघडले नाही. ते फक्त काम करायचे आणि निघून जायचे.

राजकुमार यांच्या स्वभावामूळे कलाकारांना त्यांच्यासोबत काम करणे खुप कठीण वाटतं होते. म्हणून कलाकार राजकुमारचे बोलणे शांततेत ऐकून घेत होते. त्यांना उलट उत्तर दिले तर काय होते याची चांगलीच जाणीव मिथूनला झाली होती.

महत्वाच्या बातम्या –

अभिनेत्री प्रिया राजवंशची गळा दाबून करण्यात आली होती हत्या; कारण ऐकूण धक्का बसेल

ऐश्वर्या रायमूळे आजही अविवाहीत आहे अक्षय खन्ना; सगळ्यांसमोर केले होते लग्नासाठी प्रपोज

माधूरी दिक्षित आणि आयशा जुल्कासोबत ९० च्या दशकातील ‘या’ अभिनेत्री बॉलीवूडमध्ये करणार कमबॅक

….म्हणून राजेश खन्नाने मागितली होती अमिताभ बच्चनची माफी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.