राजकूमारने केला होता अभिनेत्री वहिदा रहमानचा अपमान; दुखी झालेल्या वहिदा रहमानच्या डोळ्यात आले पाणी

६० आणि ७० च्या दशकातील सर्वात सुंदर आणि यशस्वी अभिनेत्री वहिदा रहमान ८३ वर्षांच्या झाल्या आहेत. १४ मे १९३८ ला तमिळनाडूमध्ये जन्मलेल्या वहिदा इंडस्ट्रीतील प्रभावशाली अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर अनेक दशके इंस्ट्रीमध्ये राज्य केले आहे.

अमिताभ बच्चनपासून देवानंदपर्यंत बॉलीवूडमधील मोठ्या मोठ्या अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केले आहे. वहिदा यांचा अभिनय आणि त्यांचे सौंदर्य अभिनेत्यांना चांगलेच घायाळ करतात. त्यांनी त्या काळातील सुपरस्टार राजकूमारसोबत देखील चित्रपट केले.

चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यामूळे त्यांच्यामध्ये चांगली बॉन्डिंग झाली होती. अनेकदा वाद देखील व्हायचे. राजकूमार त्यांच्या स्वभावासाठी खुप प्रसिद्ध होते. ते कधी कोणाला काय म्हणतील याचे नेम नव्हते. एकदा त्यांनी वहिदा रहमानला असेच काही बोलले होते. त्यामूळे वहिदा चांगल्याच नाराज झाल्या होत्या. जाणून घेऊया पुर्ण किस्सा.

हा किस्सा आहे ‘उलफत का नया दौर’ चित्रपटाच्या सेटवरील. चित्रपटात वहिदा रहमान, राजकूमारसोबतच साधना देखील काम करत होत्या. त्यामूळे त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. साधना आणि वहिदा रेहमान तर सुरुवातीपासूनच चांगल्या मैत्रीणी होत्या.

एक दिवस वहिदा रहमानने साधना आणि राजकूमारला घरा जेवायला बोलावले. वहिदा रहमानच्या घरी त्या दिवशी चांगलीच मेहफिल रंगली होती. वहिदा रहमानने स्वत: खास लक्ष देऊन जेवणाची सगळी तयारी केली होती. सगळेजण जेवायसा बसले त्यावेळी साधनाने राजकूमारला जेवायला बोलावले. पण त्यांनी नकार दिला आणि तुम्ही जेवून घ्या सांगितले.

थोड्या वेळाने वहिदा रहमान स्वत: राजकूमारकडे गेल्या आणि त्यांना जेवायला बोलावले. पण त्यांनी परत नकार दिला. त्यामूळे वहिदाने त्यांना तुम्ही जेवणच करत नसाल ना? असा प्रश्न केला यावर राजकूमार म्हणाले की, मी जेवण करतो पण कुठेही आणि कोणाच्याही घरी जेवत नाही.

राजकूमारचे हे उत्तर ऐकूण वहिदा रहमान दुखी झाल्या आणि तिथून निघून गेल्या. त्यांचा हा किस्सा सलीमा खानने कपिल शर्माच्या शोमध्ये सांगितला होता. ज्यामूळे अनेकांना धक्का बसला होता. पण राजकूमार त्यांच्या स्वभावासाठी नेहमीच प्रसिद्ध होते. त्यामूळे एक दोन कलाकार नाही तर अनेक कलाकारांना त्यांचा अनूभव आला आहे.

महत्वाच्या बातम्या –
…म्हणून मनीषा कोईरालाने सुपरहिट चित्रपट ‘जुबेदा’ला दिला होता नकार
माधुरी दीक्षितने शेअर केला विना मेकअपचा फोटो, फोटो पाहून चाहत्यांना विश्वासच बसेना, म्हणाले..
प्रसिध्द गायक अरिजीत सिंहवर कोसळला दु:खाचा डोंगर; सर्वात जवळच्या व्यक्तीचं कोरोनानं निधन
तीन वर्षात सलग तिसऱ्यांदा आई बनतीये बॉलीवूड अभिनेत्री; लोक म्हणाले, आत्ता तरी…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.