‘मम्मी बघ पप्पांना चटके बसत आहेत’; राजीव सातवांच्या चिमुरडीच्या आर्त हाकेने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले

हिंगोली | काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांना सोमवारी हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. मुलगा पुष्कराज याने सातव यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. पण यावेळी सातव यांच्या मुलीने असे काही उद्गार काढले की, त्याठिकाणी असलेल्या सर्वांच्याच काळजाला चटका लागला.

राजीव सातव यांचं रविवारी निधन झाले. वयाच्या ४७ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. राजीव सातव यांच्या निधनाने राज्य आणि देशाच्या राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात आली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मसोड या मुळ गावी सातव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत इतर मोठे नेते उपस्थित होते. राजीव सातव यांचा मुलगा पुष्कराज यानं सातव यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

यावेळी अत्यंत भावनिक आणि काळजाला स्पर्श करणारा असा प्रकार घडला. सातव यांचा मुलगा पुष्कराज याने मुखाग्नी दिल्यानंतर चिता पेटली. त्यावेळी सातव यांच्या मुलीने आईला घट्ट मिठी मारली आणि त्यानंतर ती जे काही बोलली ते सर्वांना स्तब्ध करणारं होतं.

ईटिव्ही भारतच्या वृत्तानुसार चिता पेटली असताना सातव यांच्या मुलीनं “मम्मी बघ पप्पांना चटके बसत आहेत” असं म्हणत अश्रुंना वाट मोकळी करून दिली. तेव्हा पिता गमावलेल्या त्या मुलीची समजूत कशी काढायची हे कुणालाही कळत नव्हतं.

राजीव सातव हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे बडे नेते होते. दिल्लीत काँग्रेस पक्षात त्यांचे चांगलेच वजन होते. राहूल गांधी यांच्या ते खूप जवळचे होते. २०१४ च्या मोदी लाटेत राजीव सातव शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करत खासदार झाले होते.

महत्वाच्या बातम्या-
सर्वात जवळचा सहकारी राजीव सातवांच्या निधनानंतर राहूल गांधी झाले हळवे; दिली ह्रदयद्रावक प्रतिक्रीया
राष्ट्रवादीची सीट घेऊन राजीव सातवांना निवडणूकीत उतरवलं अन् सातवांनी मोदी लाटेतही जिंकून दाखवलं
मोठी बातमी! ऑक्सिजनचा काळाबाजार केल्याप्रकरणी बड्या उद्योगपतीस अटक
कोरोना नियम मोडणाऱ्यांना मध्यप्रदेशात भलतीच शिक्षा; लिहायला लावतात भगवान श्रीरामाचे नाव

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.