राष्ट्रवादीची सीट घेऊन राजीव सातवांना निवडणूकीत उतरवलं अन् सातवांनी मोदी लाटेतही जिंकून दाखवलं

काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून राजीव सातव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. राहून गांधीचे चांगले मित्र एवढ्यापुरतीच त्यांचे ओळख मर्यादित नव्हती.

राजीव सातव यांनी लोकांमधून निवडून येण्याची कामगिरीही दाखवली आहे. २०१४ मध्ये त्यांनी संपुर्ण देशात मोदी लाट असताना हिंगोली मतदार संघातू लढत विजय मिळवून दाखवला होता.

२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि राजीव सातव हे दोनच खासदार निवडून आले होते. २०१४ मध्ये हिंगोली मतदार संघ राष्ट्रवादीकडे होता. मात्र राजीव सातव यांच्यासाठी त्यावेळी काँग्रेसने राष्ट्रवादीशी वाटाघाटी केली होती.

त्यावेळी राष्ट्रवादीला दुसरा मतदारसंघ सोडून राजीव सातव यांच्यासाठी मागून घेण्यात आला होता. त्यामुळे त्यावेळचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राजीव सातव यांच्या समर्थकांना पक्षांतर्गत टिकेला सामोरे जावे लागले होते. पण राजीव सातव यांनी शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांना पराभूत करुन दाखवले होते.

फेब्रुवारी २०१० ते डिसेंबर २०१४ च्या काळात राजीव सातव यांनी युवा काँग्रेसचे अध्यक्षपदही भुषवले होते. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणूकीची उमेदवारी त्यांनी नाकारली होती. तोपर्यंत राजीव सातव यांनी काँग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीवरचे नेते झाले होते.

गेल्या काही दिवसांपासून राजीव सातव कोरोनाशी झुंझ देत होते. तसेच ते २३ दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. कोरोनावर मात केल्यानंतर त्यांच्यावर शरीरात सायटोमॅजिलो नावाचा व्हायरस आढळला होता. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते, मात्र त्याच दरम्यान त्यांचा मृत्यु झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

VIDEO: “इस्त्रायलसोबत उभे राहणाऱ्यांनी आधी वाजपेयींचे हे भाषण ऐका”
राजकारणातला देवमाणूस गेला; राजीव सातवांबद्दल बोलताना मंत्री वडेट्टीवार ढसाढसा रडले
मी संसदेतील चांगला मित्र गमावला; राजीव सातव यांच्या जाण्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.