ना बायको ना मुलंबाळ तरीही मृत्यूनंतर ‘एवढी’ संपत्ती मागे सोडून गेले राजीव कपूर

मुंबई | पाठिमागच्या वर्षीच कपूर कुटूंबातील ऋषी कपूरचे निधन झाले होते. यानंतर ऋषी कपूरचे लहान भाऊ राजीव कपूर यांचे मंगळवारी (ता.९) हृदयविकारच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने फिल्म इंडस्ट्रीला खुप मोठा धक्का बसला आहे.

बॉलीवूडचे शो मॅन राज कपूर यांची तीन मुलं रणधीर, ऋषी आणि राजीव कपूर इंडस्ट्रीमध्ये कार्यरत होते. पण राजीव कपूर यांना अभिनय क्षेत्रात खास यश मिळाले नाही. त्यांनी अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही काम केले. पण त्यांना जास्त यश मिळाले नाही.

‘एक जान है हम’ या चित्रपटातून राजीव कपूर यांनी १९८३ ला बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. पण हा चित्रपट फ्लॉप झाला. म्हणून राज कपूर यांनी ‘राम तेरी गंगा मैली हो गयी’ चित्रपटातून राजीव यांना परत एकदा बॉलीवूडमध्ये लॉन्च केले. हा चित्रपट हिट झाला होता.

राजीव कपूर यांना चित्रपटसृष्टीत फारस यश मिळाले नाही. त्यांनी २००१ मध्ये आर्किटेक्ट आरती सब्बरवाल यांच्याशी लग्न केले. मात्र लग्नाच्या दोनच वर्षात दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर राजीव कपूर यांनी दुसरं लग्न केले नाही.

राजीव कपूर यांना अभिनय क्षेत्रात फारसे यश मिळाले नाही. परंतु त्यांनी वेगवेगळ्या साधनांनी कमाई केली आहे. ते चित्रपच निर्माते  व दिग्दर्शक होते. याबरोबरच त्यांनी वेगवेगळ्या व्यवसायिक उद्योगात शेअर्स खरेदी केले होते.

राजीव कपूर यांनी ब्रॅण्ड जाहीरातीमधून बरीच कमाई केली आहे. त्यांच्याकडे तब्बल ५० कोटींपेक्षा जास्त किमतीच्या लक्जरी कार होत्या. तसेच मुंबईत त्यांचा स्वत:चा बंगला आहे. या बंगल्याची किंमत ७२ कोटी रुपये इतकी आहे.

राजीव यांचे वार्षिक उत्पन्न २० कोटी रुपये इतके आहे. मुंबईच्या बंगल्यासोबतच त्यांच्याकडे अलिबाग येथे फार्महाऊस आहे. या फार्महाऊसची किंमत कोट्यावधी रुपयात आहे. तसेच दुबईत, लंडनमध्ये त्यांचे बंगले आहेत. या विदेशातील बंगल्यांची किंमत १७० कोटी रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या-
मृत्यूनंतर ‘एवढी’ संपत्ती मागे सोडून गेले ऋषी कपूर
सनी देओलने ज्या अभिनेत्याची धुलाई केली होती; शेवटी त्याच अभिनेत्याच्या लग्नाच्या पत्रिका स्वत: वाटल्या
अमृता सिंगसोबत झालेल्या घटस्फोटाची आठवण काढून रडला सैफ; म्हणाला, माझ्यासाठी सर्वात कठिण…
नऊ तास नोकरी करून ‘या’ महिलेनी केली यूपीएससीची परीक्षा पास

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.