…म्हणून कपूर कुटुंबाने जेष्ठ अभिनेते राजीव कपूर यांची शोकसभा घेतली नाही

मुंबई | मंगळवारी (ता.९) बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने बॉलिवूड शोकाकुल झाले आहे. अभिनेते राजीव कपूर यांच्या अंत्यदर्शनाला कपूर कुटुंबासोबतच चित्रपटसृष्टीतल अनेक कलाकारांची उपस्थिती होती. मात्र यानंतर राजीव कपूर यांची शोकसभा होणार नसल्याचे कपूर कुटुंबाकडून सांगण्यात आले आहे.

जेष्ठ अभिनेते राजीव कपूर यांची शोकसभा होणार नसल्याची माहिती नीतू कपूर यांनी सोशल मीडियावरुवन दिली आहे. त्यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले आहे की, ‘कोरोना महामारीत सर्वांच्या सुरेक्षेच्या दृष्टीने स्वर्गीय राजीव कपूर यांची शोकसभा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ईश्वर त्यांच्या आत्मास शांती देवो. संपूर्ण राज कपूर कुटुंबिय या घटनेत एकमेकांसोबत आहेत’.

https://www.instagram.com/p/CLGYSg8gWWk/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, कपूर कुटुंबाला एकापोठोपाठ एक धक्के बसले आहेत. २०१८ मध्ये राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा कपूर यांच निधन झाले होते. यानंतर गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात अभिनेत ऋषी कपूर यांचे निधन झाले होते. यानंतर आता राजीव कपूर यांच्या जाण्याने कपूर कुटुंबाला आणखी एक धक्का बसला आहे.

मुंबईतील इंलॅक्स हॉस्पिटलमध्ये राजीव कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे.

राजीव कपूर हे ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे छोटे भाऊ होते. त्यांची तब्बेत बिघडल्याचे समजताच त्यांचे भाऊ रणधीर कपूर यांनी तातडीने राजीव यांनी जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र उपचार होण्याआगोदरच राजीव कपूर यांचा निधन झाले आहे.

राजीव कपूर यांनी राम तेरी गंगा मैली, एक जान है हम, या चित्रपटात काम केले होते. त्यांच वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या वर्षीच ऋषी कपूर यांचे निधन झाले होते. यानंतर चित्रपटसृष्टीला आणि कपूर कुटुंबाला आणखी एक धक्का बसला.

बॉलीवूडचे शो मॅन राज कपूर यांची तीन मुलं रणधीर, ऋषी आणि राजीव कपूर इंडस्ट्रीमध्ये कार्यरत होते. पण राजीव कपूर यांना अभिनय क्षेत्रात खास यश मिळाले नाही. त्यांनी अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही काम केले. पण त्यांना जास्त यश मिळाले नाही.

‘एक जान है हम’ या चित्रपटातून राजीव कपूर यांनी १९८३ ला बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. पण हा चित्रपट फ्लॉप झाला. म्हणून राज कपूर यांनी ‘राम तेरी गंगा मैली हो गयी’ चित्रपटातून राजीव यांना परत एकदा बॉलीवूडमध्ये लॉन्च केले. हा चित्रपट हिट झाला होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.