वाचा पद्मिनी कोल्हापूरे आणि राजीव कपूरची हटके लव्ह स्टोरी; ‘या’ व्यक्तीमूळे पद्मिनी कपूर घराण्याच्या सुन होऊ शकल्या नाही

ऋषी कपूर आणि रणधीर कपूरचे छोटे भाऊ राजीव कपूरचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने फिल्म इंडस्ट्रीला खुप मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच कपूर कुटूंबातील ऋषी कपूरचे निधन झाले होते. आत्ता त्यानंतर राजीव कपूरचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.

बॉलीवूडचे शो मॅन राज कपूरचे तीन मुलं रणधीर, ऋषी आणि राजीव कपूर इंडस्ट्रीमध्ये कार्यरत होते. पण राजीव कपूरला अभिनय क्षेत्रात खास यश मिळाले नाही. त्यांनी अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही काम केले. पण त्यांना जास्त यश मिळाले नाही.

‘एक जान है हम’ चित्रपटातून त्यांनी बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. पण हा चित्रपट फ्लॉप झाला होता. म्हणून राज कपूरने ‘राम तेरी गंगा मैली हो गयी’ चित्रपटातून राजीवला परत एकदा बॉलीवूडमध्ये लॉन्च केले. हा चित्रपट हिट झाला. पण चित्रपटाचे सगळे क्रेडिट मंदाकिनीला देण्यात आले.

फिल्मी करिअरमूळे चर्चेत नसले तरी राजीव कपूर नेहमी त्यांच्या लव्ह अफेअरमूळे चर्चेत असायचे. अनेक अभिनेंत्रीशी त्यांचे नाव जोडले गेले होते. पण सर्वात जास्त चर्चा झाली ती राजीव कपूर आणि पद्मिनी कोल्हापूरेच्या अफेअरच्या प्रेम प्रकरणाची.

‘सत्यम शिवम सुंदरम’ चित्रपटामध्ये पद्मिनीने बालकलाकार म्हणून काम केले होते. राज कपूरला पद्मिनीचा अभिनय खुप जास्त आवडला होता. त्यांनी ‘प्रेम रोग’ चित्रपटातून तिला बॉलीवूडमध्ये लॉन्च करण्याचा निर्णय घेतला. ऋषी कपूर चित्रपटामध्ये मुख्य अभिनेता होते.

चित्रपटाचे दिग्दर्शन राज कपूरने केले होते. तर राजीव कपूर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होते. चित्रपटाच्या शुटींग वेळी राजीव पद्मिनीच्या प्रेमात पडले. त्यांना पद्मिनीशी लग्न करायचे होते. पण ही गोष्ट राजीव कपूरला मान्य नव्हती.

त्यांनी राजीवला पद्मिनीपासून लांब राहायला सांगितले. शुटींग वेळी अनेकदा राजीव पद्मिनीच्या रुममध्ये असायचे. ते दोघे रात्रभर गप्पा मारत बसायचे. ह्या गोष्टीमूळे राज कपूर खुप चिडले. शेवटी वैतागून त्यांनी राजीवला चित्रपटाच्या सेटवरुन बाहेर काढले.

दुसऱ्या दिवशी राजीव शुटींगला आले तेव्हा त्यांना सेटवर घेतले गेले नाही. म्हणून ते पद्मिनीला शुटींग संपल्यानंतर भेटायचे. हे सगळे काही बघून राज कपूरने पद्मिनीला राजीवपासून दुर राहायला सांगितले. नाही तिला चित्रपटातून काढून टाकण्यात येईल अशी धमकी दिली.

पद्मिनीसाठी तिचे करिअर खुप महत्वाचे होते. म्हणून तिने राजीवपासून दुर राहण्याचा निर्णय घेतला. राज कपूरमूळे दोघांचे ब्रेकअप झाले. पद्मिनीने करिअरवर लक्ष दिले. त्यानंतर अनेक अभिनेत्रींसोबत त्यांच्या अफेअरच्या बातम्या आल्या. पण त्यांनी आरतीसोबत लग्न केले.

महत्वाच्या बातम्या –

मंजूळाच्या एक्झिटनंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची ‘देवमाणूस’ मालिकेत होणार एन्ट्री

‘फॅन्ड्री’ चित्रपटातील जब्याचा नवीन लुक पाहून तुम्ही त्याला ओळखू शकणार नाही

लग्नाआधीच बॉयफ्रेंडपासून गरोदर राहिल्या होत्या ‘या’ अभिनेत्री; तरीही लग्नानंतर नवऱ्याने दिल्ला सन्मान

‘स्टाइल’ चित्रपटातील अभिनेत्री आठवते का? फोटो पाहून तुमचा विश्वास बसणार नाही

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.