‘मोदीच नाही, तर राजीव गांधींनाही झुकावे लागले होते शेतकऱ्यांसमोर; वाचा १९८८ चा ‘तो’ किस्सा

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती आहे. देश त्यांची आठवण काढत आहे. अशा वेळी देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिनही शेतकरी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. इंदिरा गांधी आणि शेतकरी आंदोलनाबाबत हा निव्वळ योगायोग असू शकतो, पण इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे.

३२ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे ३१ ऑक्टोबर १९८८ रोजी इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीला तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना शेतकर्‍यांसमोर नतमस्तक व्हावे लागले होते. राजीव गांधींनी शेतकऱ्यांना ३५ मागण्यांवर निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर ३१ ऑक्टोबर १९८८ रोजी बोट क्लबचे आंदोलन संपले होते.

ज्याप्रमाणे गेल्या वर्षापासून शेतकरी आंदोलन करत आहे. तसेच ३२ वर्षांपूर्वी दिल्लीच्या बोट क्लबवर हल्ला करून शेतकऱ्यांनी दिल्ली ठप्प केली होती. जोपर्यंत सरकार कायदा मागे घेत नाही तोपर्यंत आपण डगमगणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला होता.

३२ वर्षांपूर्वी २५ ऑक्टोबर १९८८ रोजी शेतकरी नेते महेंद्र सिंह टिकैत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय किसान युनियनचे लोक आपल्या मागण्या घेऊन दिल्लीतील बोट क्लबवर रॅली काढणार होते. वीज कपात, सिंचन दर आणि पिकांचे रास्त भाव यासह ३५ कलमी मागण्यांसाठी पश्चिम उत्तर प्रदेशातून शेतकरी मोठ्या संख्येने दिल्लीत येत होते, त्यांना दिल्लीच्या लोणी सीमेवर पोलीस प्रशासनाने जबरदस्तीने रोखले होते.

शेतकरी थांबले नाहीत, लोणी सीमेवर पोलिसांनी गोळीबार केला आणि दोन शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. पोलिसांच्या गोळीबारात कुतबी येथील राजेंद्र सिंह आणि तितौली येथील भूप सिंह यांचा मृत्यू झाला. असे असतानाही शेतकरी दिल्लीत पोहोचले होते.

दिल्लीच्या बोट क्लबपर्यंत पोहोचून देशातील १४ राज्यांतील ५ लाख शेतकऱ्यांनी दिल्ली पूर्णपणे ठप्प करून टाकली होती. केंद्र सरकारच्या विशेष विभागांच्या इमारतींमधील हिरव्यागार बोट क्लबमध्ये शेतकऱ्यांचा मेळावा होता, त्यामुळे संपूर्ण दिल्ली स्तब्ध झाली होती.

इंडिया गेट, विजय चौक, बोट क्लब येथेच शेतकरी दिसत होते. शेतकऱ्यांनी आपल्या बैलगाड्या, ट्रॅक्टर बोट क्लबवर उभ्या केल्या होत्या. त्या दिवसांत दिल्लीच्या बोट क्लबमध्ये माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या मेळाव्यासाठी रंगरंगोटी आणि रंगकाम सुरू होते. या कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेले व्यासपीठही शेतकऱ्यांनी काबीज केले.

लुटियन्स परिसरात ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी ताबा मिळवला होता, त्यावरून मंत्र्यापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण नाराज झाले होते. महेंद्रसिंग टिकैत यांच्या नेतृत्वाखाली १२ सदस्यीय समितीने राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्ष बलराम जाखड यांची भेट घेतली, मात्र कोणताही निर्णय होऊ शकला नाही.

शेतकऱ्यांना राजपथावरून हटवण्यासाठी पोलिसांनी ३० ऑक्टोबर १९८८ च्या रात्री शेतकऱ्यांवर लाठीमार केला होता. आठवडाभराहून अधिक काळ शेतकऱ्यांनी राजपथ आपल्या ताब्यात ठेवला होता. अखेर सरकारला शेतकऱ्यांपुढे नमते घ्यावे लागले.

तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी शेतकऱ्यांना ३५ मागण्यांवर निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर ३१ ऑक्टोबर १९८८ रोजी व्होट क्लबचे धरणे संपले. मात्र, शेतकरी रॅलीमुळे राजीव गांधींना त्यांच्या आई इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या रॅलीचे ठिकाण बदलावे लागले. बोट क्लबऐवजी लाल किल्ल्यामागील मैदानावर रॅली काढावी लागली होती.

महत्वाच्या बातम्या-
मरण्याआधी ‘ही’ गोष्ट करतो माणूस; अनेक मृत्यू पाहीलेल्या नर्सच्या खुलाश्याने उडाली खळबळ
हे सरकारला उशीरा सुचलेलं शहाणपण, शरद पवारांची कृषी कायदे मागे घेण्यावर पहिली प्रतिक्रिया
मोदींचा मास्टरस्ट्रोक: एका झटक्यात विरोधकांचे डावपेच केले नष्ट, निवडणुकीत होणार ‘हा’ फायदा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.