अमिताभ बच्चनने दुसऱ्यांदा राजकारणात यायला दिला नकार; चिडलेल्या राजीव गांधीने राजेश खन्नाला बनवले स्टार

फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणारे अनेक कलाकार कालांतराने राजकारणात प्रवेश करतात. पण त्यातील खुप कलाकार राजकारणात यशस्वी होतात. अनेक वेळा तर राजकीय पक्ष कलाकारांचा वापर करुन घेतात आणि काम झाल्यानंतर त्यांना सोडून देतात. असे एकदा नाही तर अनेकदा झाले आहे.

अमिताभ बच्चन फिल्म इंडस्ट्रीतील महानायक आहेत. गेले अनेक दशके बॉलीवूडमध्ये राज्य करत असलेल्या अमिताभला अभिनयाचे महागुरु बोलले तरी चालेल. अभिनयात पदवी मिळवणारे अमिताभ राजकारणात मात्र शुन्य आहेत.

राजकारणात अमिताभ चांगलेच अपयशी झाले. त्यानंतर त्यांनी आयूष्यभरासाठी राजकारणाला रामराम ठोकला. त्यांनी परत कधीच त्या क्षेत्राकडे मागे वळून पाहीले नाही. अमिताभ त्यांचे खुप चांगले मित्र राजीव गांधीसाठी राजकारणात गेले होते.

राजीव गांधीसाठी त्यांनी अभिनयाला दुर ठेवून राजकारणाला जवळ केले होते. १९८४ मध्ये इंदिरा गांधीच्या हत्येनंतर राजीव गांधीने राजकारणात प्रवेश केला होता. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी निवडणूकांची घोषणा केली. त्यावेळी त्यांना अटल बिहारी वाजपेयी आणि हेमंत नंदासारख्या मोठ्या नेत्यांसोबत निवडणूक लढाईची होती.

ही निवडणूक जिंकण्यासाठी त्यांना मोठ्या चेहऱ्याची गरज होती. त्यावेळी अरुण नेहरुने राजीव गांधीला अमिताभचे नाव सुचवले. त्यांना हा सल्ला पटला आणि त्यांनी अमिताभला विचारले. पण अमिताभने राजकारणात यायला सरळ सरळ नकार सांगितला.

अमिताभचा नकार ऐकल्यानंतर त्यांना मनवण्यासाठी राजीव गांधीना खुप मेहनत करावी लागली होती. अनेक दिवस प्रयत्न केल्यानंतर शेवटी अमिताभ राजकारणात येण्यासाठी तयार झाले. अमिताभ इलाहाबादमधून निवडणूकीला उभे राहिले आणि जिंकलेसुद्धा.

पण काही दिवसांमध्ये अमिताभला राजकारणाचा कंटाळा आला आणि त्यांनी राजकारणातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट त्यांनी राजीव गांधीला सांगितली होती. १९९१ मध्ये राजीव गांधीला परत एकदा एका मोठ्या चेहऱ्याची गरज होती.

त्यामूळे त्यांनी अमिताभला राजकारणात येण्यास सांगितले. पण अमिताभने मात्र सरळ सरळ नकार दिला. ह्या नकाराने चिडलेल्या राजीव गांधीने अमिताभचे दुश्मने राजेश खन्नाला राजकारणात बोलावले. अमिताभ आणि राजेश खन्नाच्या नात्याबद्दल सगळ्यांनाच माहीती आहे. याच गोष्टीचा फायदा घेत राजीव गांधीने राजेश खन्नाला राजकारणात आणले.

अमिताभला धडा शिकवण्यासाठी राजीव गांधीने राजेश खन्नाचा फायदा घेतला. १९९१ मध्ये राजेश खन्ना निवडणूक हारले. पण पुढच्याच वर्षी त्यांनी परत एकदा निवडणूक लढवली आणि जिंकले. १९९१ ते १९९६ पर्यंत राजेश खन्ना राजकारणात चांगलेच सक्रिय झाले होते. या गोष्टीचा फायदा घेत राजीव गांधीने अनेक वर्ष राजकारण केले.

महत्वाच्या बातम्या –
‘हम आपके है कौन’ चित्रपटात सलमान खानच्या मागे पळणारी रिटा आठवते का? आज दिसते ‘अशी’
…म्हणून झाले प्रियांका चोप्रा व शाहीद कपूरचे ब्रेकअप; अखेर खरे कारण आले समोर
शारीरीक संबंधावरुन रेखाने केलेले विधान ऐकून उडाली होती लोकांची झोप; वाचून तुम्हालाही बसेल धक्का
अमिताभ बच्चनला धडा शिकवण्यासाठी राजीव गांधींनी राजेश खन्नाची घेतली होती मदत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.