फँड्री चित्रपटातील जब्याची शालू आता दिसतेय अशी, फोटो पाहून थक्क व्हाल

अगदी तळागाळातून वर आलेले दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सर्वच चित्रपटांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. सैराटने तर अख्ख्या जगात नाव कमवलं. तसेच त्यांनी काढलेला फॅन्ड्री चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला

फॅन्ड्री चित्रपटात देखील अनेक नवीन बालकलाकारांची निवड केली होती. ज्यात शालू नावाचे पात्र साकारणाऱ्या राजेश्वरी खरात हिचा देखील समावेश होता. फॅन्ड्री चित्रपटातील तिचे सौंदर्य व तिचा अभिनय प्रेक्षकांना खूपच भावला.

या चित्रपटासाठी नागराज यांना अभिनेत्रीचा शोध होता. पण ती काही केल्या सापडत नव्हती. एक वेळेस नागराज यांनी राजेश्वरी खरात हिला पुण्यात पाहिले होते. त्यानंतर आपल्या चित्रपटात ही अभिनेत्री असावी त्यांना वाटले.

तिला चित्रपटात तर घ्यायचे होते पण तिचा शोध लागत नव्हता. काही दिवसानंतर नागराज यांनी राजेश्वरीचा शोध घेतला. त्यांनी नगर जिल्ह्यातील ती राहत असलेले गाव शोधून काढले. सुरुवातीला राजेश्वरीच्या आईवडिलांनी चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता.

पण मंजुळे यांनी त्यांना सर्व समजावून सांगितल्यानंतर त्यांनी देखील राजेश्वरी हिला चित्रपटात काम करण्यास संमती दिली. या चित्रपटात तिने साकारलेले शालूचे पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते.

राजेश्वरी आता पूर्वीपेक्षा आणखीन जास्त सुंदर दिसत आहे. फॅन्ड्री नंतर राजेश्वरीने “आयटमगिरी” हा चित्रपट देखील केला होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.