मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या ‘फँड्री’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली शालू म्हणजेच राजेश्वरी खरात आता प्रचंड बदलली आहे. राजेश्वरीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने चित्रपटात उत्कृष्ट काम केले. आपल्या अभिनयाने तिने रसिकांच्या मनावर ठसा उमटवला.
शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे. ‘फँड्री’ चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता मात्र ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांसमोर आली आहे. इंस्टाग्रामवर तिने चाहत्यांसोबत तिचा नवा लुक शेअर केला असून चाहत्यांचीही तिला पसंती मिळत आहे.
नुकताच राजेश्वरीने सोशल मीडियावर हाॅट व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना घायाळ केले आहे. मध्ये शालू धीमे-धीमे, धीमे-धीमे, धीमे-धीमे या हिंदी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. डान्समधील शालूचे लटके झटके चाहत्यांना आकर्षित करत आहेत.
शालूचा जिलेबी बाई गाण्यावरील डान्स पाहून चाहते झाले घायाळ
अभिनयासोबतच राजेश्वरी उत्तम डान्सर देखील आहे. ती तिच्या डान्सचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट करत असते. काही दिवसांपूर्वीच राजेश्वरीने जेलेबी बाई गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओला तिच्या चाहत्यांनी खुप पसंत केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
अंकिता लोखंडेचा भन्नाट डान्स व्हिडीओ व्हायरल; सुशांतच्या फॅन्संनी केलं ट्रोल
‘मोदी सरकारने डिझेलच्या करातून २१ लाख कोटी कमावले’
राहुल वैद्यला मागे टाकत रुबीना दिलैक ठरली बिग बॉस १४ची चॅम्पियन…