बाप्पाच्या आगमनानिमित्त शालूने नऊवारी साडी घालून केले नृत्य; व्हिडिओने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

सगळ्यांच्या घरी आता गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रीटी आपल्या लाडक्या बाप्पांसोबतचे फोटो काढताना दिसून येत आहे. अनेक सेलिब्रीटींचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अशातच सर्वांची लाडकी शालू म्हणजेच राजेश्वरी खरातनेही बाप्पाच्या आगमन सोहळ्यानिमित्त एका गाण्यावर नृत्य केले आहे. नऊवारी साडी नेसून पारंपारिक वेशात राजेश्वरीने एकदंताय वक्रतुंडाय… या गाण्यावर सादरीकरण केले आहे.

राजेश्वरी खरातने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. एकदंताय वक्रतुंडाय या गणेश वंदनेवर राजेश्वरी नृत्य करताना दिसून येत आहे. लाडक्या शालूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तिचा हा पारंपारीक लुक बघून लोकांनी भुरळच पडली आहे.

सोशळ मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ लोकांना चांगलाच आवडला आहे. तिच्या फोटोंवर आणि व्हिडिओ नेहमीच लोक कमेंट करताना दिसत असतात. आताही अनेकांनी शालूच्या फोटोवर कमेंट केल्या आहे. आतापर्यंत तिचा हा व्हिडिओ ४६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी बघितला असून अनेकांनी तिच्या नृत्याचे कौतुक केले आहे.

सध्याचे मराठी चित्रपटसृष्टीचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या फँड्री चित्रपटात राजेश्वरी खरात पहिल्यांदा झळकली होती. शालू या पात्रामुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. तिच्या घायाळ करणाऱ्या नजरेने तिने अनेकांची मनं जिंकली होती.

फँड्रीनंतर राजेश्वरी खरातने आयटमगिरी या चित्रपटात काम केले होते. पण हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटात दिसून आली नाही. आता तिच्या रेड लाईट या लघू चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाला असून हा लघू चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘सेक्स कराल तरच तुम्हाला काम मिळेल’, ‘या’ अभिनेत्रीचा बाॅलीवूडबाबत धक्कादायक खुलासा
महत्वाची बातमी! लशीचे दोन्ही डोस घेतले तरी ‘या’ लोकांना घ्यावा लागणार बुस्टर डोस
साकीनाका रेप केस: निलम गोऱ्हे थेट वर्षावर दाखल; मुख्यमंत्र्यांना दिला ‘हा’ सल्ला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.