शालूचा अदांनी चाहते घायाळ; सोशल मिडीयावर व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

मुंबई | ‘फँड्री’ या चित्रपटातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी शालू तुम्हाला आठवतं असेलच…! नागराज मंजूळे यांच्या या चित्रपटात सोमनाथ अवघडेने मुख्य भुमिका साकारली होती. तर राजेश्वरी खरातने मुख्य अभिनेत्रीची भुमिका निभावली होती.

राजेश्वरी नेहमी तिचे फोटो – व्हिडीओ सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेअर करत असते. तिचे चाहते फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स करत असतात. आता नुकताच शालूने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये शालूचा एकदम हॉट अंदाज दिसत आहे.

शनिवारीच राजेश्वरीने एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओला राजेश्वरीने खास कॅप्शन देखील दिले होते. राजेश्वरीने म्हणतीये, ‘खुब पेहेचानू तेरे दिल मी है क्या.’ तसेच राजेश्वरीचा वेगळा चाहता वर्ग आहे. तिने अनेक दिवस मेहनत केल्यानंतर स्वत: चा वेगळा चाहता वर्ग तयार केला आहे.

शालूचा जिलेबी बाई गाण्यावरील डान्स पाहून चाहते झाले घायाळ
अभिनयासोबतच राजेश्वरी उत्तम डान्सर देखील आहे. ती तिच्या डान्सचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट करत असते. काही दिवसांपूर्वीच राजेश्वरीने जेलेबी बाई गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओला तिच्या चाहत्यांनी खुप पसंत केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
शशांक केतकर बनला ‘बाप’माणूस; बाळाचा फोटो शेअर करत दिली गुड न्यूज…
कंगनाने काँग्रेस आमदाराला सुनावले; ‘मी कंबर हलवत नाही सरळ हाडं तोडते’
करिना-सैफच्या घरी पुन्हा छोट्या नवाबाचं आगमन; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.