तुझ्यावर कोणी बलात्कार केला?; पोस्टवर अश्लील कमेंट करणाऱ्याला शालूने शिकवला धडा, म्हणाली…

नागराज मंजुळे यांच्या फँड्री या चित्रपटापासून अभिनय क्षेत्राला सुरुवात करणाऱ्या शालूने म्हणजेच राजेश्वरी खरातने आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. आज ती मराठी सिनेसृष्टीतील एक लोक प्रिय अभिनेत्री बनली आहे.

राजेश्वरी सोशल मीडियावर खुप ऍक्टिव्ह असते. तसेच तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ पाहून चाहते तिचे कौतूक करत असतात.

अशात अनेक लोक राजेश्वरीला विनाकारण ट्रोल करण्याचा प्रयत्नही करत असतात. त्यामुळे ती अनेकदा ट्रोल करणाऱ्यांना बिंधास्तपणे उत्तर देत असते. अशात एका युजरने तर आपली पातळी सोडली असून राजेश्वरीला थेट तुझ्यावर कोणी बलात्कार केला? असा प्रश्न विचारला आहे. पण या कमेंटला राजेश्वरीने जोरदार उत्तर दिले आहे.

अशी कमेंट करणारे आणि अशाप्रकारचे रिप्लाय देणारे, तुम्ही कसे काय जन्माला येतात रे? मनुष्य तुमच्यासारखे तरी नसतात. त्यांची लायकी खुप मोठी आहे. असला घाणेरडापणा मला माझ्या पोस्टवर नकोय.

आपल्या आईवडिलांना, बहिण, भाऊ यांना हे प्रश्न विचारा ते नक्की याचे उत्तर देतील. कारण संस्कार आई वडिलच करत असतात. किती हिम्मत म्हणजे एखाद्या मुलीच्या पोस्टवर अशा कमेंट्स करणे, वाह आणि कोणी काही बोलत सुद्धा नाही यांना. लायकी आहे का राजे महाराजांचे प्रोफाईल फोटो ठेवायची, असे उत्तर राजेश्वरी खरातने दिले आहे.

सोशल मीडियावर अनेक ट्रोलर्स राजेश्वरीला ट्रोल करत असतात, पण ती न घाबरता बिंधास्तपणे त्यांना तोडीस तोड उत्तर देत असते. त्यामुळे सोशल मीडियावर राजेश्वरीच्या हिंमतीचे लोक कौतूकही करत असतात.

महत्वाच्या बातम्या-

एकेकाळी यशाच्या शिखरावर असणारा आफताब शिवदसानीआजकाल कुठे गायब आहे; जाणून घ्या..
‘सिलसिला’ चित्रपटासाठी पहीली पसंत होत्या स्मिता पाटील आणि परवीन बाबी; पण अमिताभमूळे रातोरात सगळे बदलले
कुटुंबानेच कोरोना रुग्णाचा मृतदेह फेकला नदीत?; धक्कादायक व्हिडिओ होतोय व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.