राष्ट्रवादीच्या आणखी एका बड्या नेत्यावर बलात्काराचा आरोप; तृप्ती देसाईंनी पिडीतेला आणले समोर

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी पक्षातील अनेक बड्या नेत्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होतं आहेत. यापूर्वी सामाजिक कल्याण मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यासारख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले होते.

आता परभणी जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार आणि नेते राजेश उत्तमराव विटेकर यांनी एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आहे. देसाई यांनी केलेल्या या आरोपामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पत्रकार परिषदेमध्ये बोलताना तृप्ती देसाई यांनी राजेश उत्तमराव विटेकर यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, अशी मागणी केली. याचबरोबर यामध्ये त्यांच्या आईही सहभागी आहेत, असा गंभीर आरोप तृप्ती देसाईंनी केला आहे.

वाचा पीडितेने केलेले आरोप…
“माझे अश्लील व्हिडीओ केले आहेत. वर्षभरापासून माझ्यावर अत्याचार करण्यात आला. अद्याप गुन्हा दाखल करत नाहीत. माझ्याकडे पुरावे आहेत, फक्त तपास सुरू असल्याचे सांगतात. शरद पवार यांच्यामुळे गुन्हा दाखल होणार नाही, असं राजेश विटेकर म्हणतात” असा दावा पीडितेने केला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावरही आरोप झाले होते. एका तरुणीच्या आत्महत्येनंतर राठोड संशयाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

महत्त्वाच्या बातम्या 

‘दिपाली चव्हाणाच्या आत्महत्येच्या मुळाशी वाघ आणि सागवान तस्कर’

तुम्ही कायद्यापेक्षा मोठे आहात का? FIRशिवाय सीबीआय चौकशी कशी? परमबीरसिंगांना कोर्टाने फटकारले

सोमी अलीने एवढ्या वर्षांनंतर सांगितले तिच्या आणि सलमान खानच्या ब्रेकअपचे खरे कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.