राज्यातील परिस्थिती पाहून लॉकडाऊन हाच एक पर्याय; राजेश टोपेंचे मोठे विधान

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज विक्रमी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळ सर्वांनाच एक प्रश्न पडला आहे तो म्हणजे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार का? राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केले आहे.

याबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, ‘लॉकडाऊन सध्या कुणालाच नको आहे. पण परिस्थिती येते तेव्हा तहान लागल्यावर विहीर खोदू शकत नाही. लॉकडाऊन ऐनवेळी लावणे शक्य नाही, त्याचा अभ्यास करावा लागतो, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली, असे टोपे यांनी म्हटले.

तसेच ‘निर्बंध कडक करायचे असतील तर कसे करायचे, उद्योगांना हात लावू नये, स्थलांतरित मजुरांचा मुद्दा उपसिथ्त झालेल्या क्षेत्राला हात लावू नये वैगेरे अशा अनेक गोष्टींचा अभ्यास होतो. त्या अभ्यासातून , परिस्थितीवर नजर ठेवून नंतर निर्णय घेतला जात असतो. त्यामुळे तात्काळ लॉकडाउनचा निर्णय घेला जात नाही. निर्बंध कडक करत जावं लागतं, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, ‘कोणत्याही परिस्थितीत जे निर्बंध सांगितले आहेत ते पाळले जावेत अशी सरकारला जनतेकडून अपेक्षा आहे. लग्नाला गर्दी करु नका, विनाकारण गर्दी करु नका, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग गोष्टींचं पालन केलं पाहिजे,’ असे आवाहन टोपे यांनी केले आहे.

  ‘…तर लॉकडाऊनबाबत नियोजन करा’
राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे पालन होत नाही, विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत, मास्क याचे पालन होताना दिसत नाही.’

तसेच पुढे ते म्हणाले, ‘लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला  आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

महत्त्वाच्या बातम्या    

“देवेंद्र फडणवीस शब्दाला जगणारे; त्यांच्या शब्दावर माझा विश्वास”

‘ईडी’च्या नोटिसा पाहून एकनाथ खडसेंना कोरोना होतो, पण माझं तसं नाही’

राजेश खन्नाच्या ‘त्या’ सल्ल्यावर डिंपल कपाडियाला झाले होते हसू अनावर; वाचा पुर्ण किस्सा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.