#Lockdown : लॉकडाउनसंबंधी राजेश टोपेंचं मोठं विधान; म्हणाले…

मुंबई : नव्या कोरोना रुग्णांचा राज्यातील वाढता आकडा पाहता आता याचा ताण आरोग्य यंत्रणांवर येऊ लागला आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स आणि इतर आरोग्य सुविधाही अपुऱ्या पडू लागल्या आहेत. अशातच ठाकरे सरकारकडून लॉकडाउन लावलं जातंय की काय अशी चर्चा सुरु आहे.

तर दुसरीकडे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना लॉकडाउनसंबंधी मोठं विधान केलं आहे. “लॉकडाउन हा शेवटी विचार करुन निर्णय घेण्याचा विषय आहे,’ असे टोपे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

तसेच ‘निर्बंध कडक करायचे असतील तर कसे करायचे, उद्योगांना हात लावू नये, स्थलांतरित मजुरांचा मुद्दा उपसिथ्त झालेल्या क्षेत्राला हात लावू नये वैगेरे अशा अनेक गोष्टींचा अभ्यास होतो. त्या अभ्यासातून , परिस्थितीवर नजर ठेवून नंतर निर्णय घेतला जात असतो. त्यामुळे तात्काळ लॉकडाउनचा निर्णय घेला जात नाही. निर्बंध कडक करत जावं लागतं, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, ‘कोणत्याही परिस्थितीत जे निर्बंध सांगितले आहेत ते पाळले जावेत अशी सरकारला जनतेकडून अपेक्षा आहे. लग्नाला गर्दी करु नका, विनाकारण गर्दी करु नका, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग गोष्टींचं पालन केलं पाहिजे,’ असे आवाहन टोपे यांनी केले आहे.

लॉकडाऊनच्या निर्णयावरुन राज्य सरकारमधील पक्षांमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. लॉकडाऊन हा कोणालाही प्रिय नसतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही तशी इच्छा नाही. राज्यातील एकाही व्यक्तीला पुन्हा लॉकडाऊन लागावा, असे वाटत नाही.

पण आपल्याकडे ‘तहान लागल्यावर विहीर खोदायची’, अशी एक म्हण आहे. तशी परिस्थिती ओढावू नये म्हणून आपण तयारी करत असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या 

निर्मात्याने अंकिता लोखंडेकडे केली नको ती मागणी; तिचे उत्तर ऐकून तुम्हाला गर्व वाटेल

दारूच्या नशेतील अजय देवगनाला दिल्लीत मारहाण? स्वता अजयनेच केला खुलासा; म्हणाला..

भारतीय वैज्ञानिकाचा पुन्हा नासात डंका, एका रुममधून गुप्ता सांभाळताय नासाचे मिशन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.