राज्यात लॉकडाऊन वाढणार का? आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोना राज्यात मोठ्या प्रमाणावर वाढत असून राज्यात जर कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊन वाढवणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

राज्यात १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन राहणार असून त्यानंतर लॉकडाऊन राहणार किंवा नाही याबाबद्दलची माहिती राज्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.

राज्यात पण कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे, तसे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच दिले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे की, “राज्यात रुग्णांची संख्या ६०- ६५ हजारांच्या आसपास आहे. अद्याप राज्याचा पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला नाहीये. राज्यातील ३६ पैकी १२ जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी दर कमी होतोय.

पण काही जिल्ह्यात हा दर स्थिर आहे. काही जिल्ह्यात करोनाचा वाढता दर दिसतोय तिथं कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. राज्यात लॉकडाऊन वाढवायचा की थांबायचं याचा विचार १५ तारखेनंतरच करण्यात येईल.”

राज्यात रुग्णसंख्या वाढीला ब्रेक लागला असला तरी रोज वाढणारी रुग्णसंख्या मोठी आहे. शुक्रवारी राज्यात ५४ हजार २२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर त्याचवेळी ३७ हजार ३८६ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत.

राज्यात ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा ६ लाख ५४ हजार ७८८ इतका झाला आहे. काल पूर्ण दिवसभरात राज्यात ८९८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील त्यात सर्वाधिक १०२ मृत्यू आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.