जीव वाचवायचा तर लॉकडाऊन करणे भाग आहे; टोपेंनी दिले १५ दिवसांच्या लॉकडाऊनचे संकेत

मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

‘राज्यात तुर्तास लॉकडाऊन करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, आपली सर्व चर्चा त्याच दिशेने सुरु आहे. पण याचा अर्थ लॉकडाऊन लागेलच, असा नाही.  पण सरकारला तशी तयारी करुन ठेवणे हे गरजेचे असते, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

सध्या २ एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र या चर्चा टोपे यांनी फेटाळून लावल्या आहेत. लॉकडाऊनसंदर्भात तुर्तास तरी चर्चा सुरु आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

‘राज्यातील लोक १५ दिवस गर्दीच्या ठिकाणी गेलेच नाहीत तर कोरोनाची साखळी तुटू शकते. मात्र, त्यामुळे अनेकांच्या रोजगाराची समस्या उद्भवते. परिणामी आम्ही लॉकडाऊन हा सर्वात शेवटचा पर्याय ठेवला आहे. शेवटी जीव वाचवायचा असेल तर लॉकडाऊन करणे भागच आहे, असेही टोपे म्हणाले.

‘वर्क फ्रॉम होम’साठी राज्य सरकारची चाचपणी
‘वर्क फ्रॉम होम’साठी राज्य सरकारची चाचपणी सुरु आहे. लॉकडाऊनपेक्षा जास्तीत जास्त लोकांना घरी बसून कसं काम करता येईल यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. याबद्दल राज्य सरकार सर्व खाजगी कंपन्यांना आदेश देण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

दिपाली चव्हाणाच्या आत्महत्या प्रकरणावर प्रकाश आंबेडकर यांनी केला खळबळजनक गौप्यस्फोट; म्हणाले…

लॉकडाऊनची काही आवश्यक्ता नाही लॉकडाऊनच्या धमक्या देणं बंद करा; कॉंग्रेस नेत्याने सुनावले

करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नावाखाली जो तमाशा सुरू आहे तो बंद करा; काॅंग्रेस नेत्याचा निशाणा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.