आरोग्यमंत्री गांजा ओढून पत्रकार परिषद घेतात का?; गोपीचंद पडळकरांचा राजेश टोपेंवर घणाघात

राज्यभरात कोरोनाच्या संकाटाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात आता लसीकरणालाही सुरुवात झाली आहे.

आता १८ वर्षांवरील सर्व नागरीकांच्या मोफत लसीकरणाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली होती. आता कोरोनाच्या लसीकरणावरुनही सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षात जुंपल्याच दिसून येत आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी त्यांनी राज्यात पुरेसा लसीचा साठा नसल्यामुळे १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांचे लसीकरण करता येणार नाही, असे सांगितले आहे. आता आरोग्यमंत्र्यांच्या याच विधानावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राजेश टोपेंवर निशाणा साधला आहे.

सकाळच्या पत्रकार परिषदेत १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांचे लसीकरण होणार, असे सांगितले. त्यानंतर संध्याकाळच्या ४ वाजेच्या पत्रकार परिषदेत लसीकरण १ मेपासून होणार नाही, असे म्हणाले. मग जी सकाळची पत्रकार परिषदेत गांजा ओढून घेतली होती का? अशी टिका गोपीचंद पडळकर यांनी राजेश टोपे यांच्यावर केली आहे.

सकाळच्या पत्रकार परिषदेत १ तारखेपासून १८ वर्षावरील सर्व नागरीकांचे लसीकरण करणार नाही, असे सांगतात. त्यानंतर संध्याकाळी ४ च्या परिषदेत लसीकरण करता येत नाही, असे म्हणतात. हे लोक पुरते गोंधळलेले आहे. उठसुट सरकारकडे बोट दाखवायचे, विचारसरणी एक नाही, असेही गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.

तसेच भाजपाची जिरवण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र आले, पण भाजपाचे काम चांगले असल्यामुळे त्यांना ते करता आले नाही. म्हणून सत्ताधारी महाराष्ट्राच्या जनतेची जिरवत आहे, राजकारण करण्यापेक्षा मृत्युचे दर कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे, असेही गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

तुम्हाला माहित आहे का? दोनदा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला महाभारतातील भीमाने; जाणून घ्या अधिक माहिती
भाजप नगरसेवकाची महीला आरोग्य अधिकाऱ्याला रडेपर्यंत शिवीगाळ; म्हणाला, आयता पगार घेता
उन्हाळ्यात चिंच घातलेले जीरापाणी पिऊन शरीराला ठेवा थंड; पोटाच्या त्रासापासुनही मिळेल मुक्ती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.