राजेश टोपेंना जेवायलाही वेळ मिळत नाही, गाडीतच केला अल्पोपहार

राज्यभरात कोरोना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सगळीकडे चिंता व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा एक व्हिडिओ खुप चर्चेत आला आहे.

कोरोनाच्या संकटात आरोग्यमंत्री राजेश टोपे दिवसरात्र काम करताना दिसत आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी टोपेंना आपल्या कामांमुळे जेवणासाठीही वेळ मिळता नाही, असे दिसून येत आहे. कारण त्यांच्या एका व्हिडिओमध्ये त्यांना जेवणासाठी वेळ मिळत नसल्याने त्यांनी गाडीतच अल्पोपहार केल्याचे दिसून येत आहे.

राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे कोरोनाला नियंत्रणात असताना त्यांना जेवायलाही वेळ मिळत नाही, असे या व्हिडिओमधून दिसत आहे.

राजेश टोपे मुंबईला जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी वेळ वाचावा म्हणून औरंगाबाद विमानतळावरच गाडीत बसून त्यांनी अल्पोपहार घेतला आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

त्यानंतर राजेश टोपे औरंगाबादहून मुंबईला विमानाने रवाना झाले आहे. राजेश टोपे यांनी वेळ जाईल म्हणून गाडीतच अल्पोपहार घेत आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे या कामाचे सगळीकडूनच राजेश टोपे यांचे कौतूक होत आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी राजेश टोपे त्यांच्या आई शारदा टोपे यांची प्रकृती स्थिर नसताना त्यांनी आपल्या आईसोबतच महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेवरही लक्ष ठेवले होते. त्यानंतर १ ऑगस्ट २०२० ला शारदा टोपे यांचे निधन झाले होते. त्यावेळी दु:खाचा डोंगर कोसळला असतानाही त्यांनी तीनच दिवसात अंत्यविधीचे सर्व कामे आटोपून ते पुन्हा कामाला लागले होते.

महत्वाच्या बातम्या-

राजेश टोपेंचा व्हिडिओ चर्चेत, कर्तव्याला दिले प्राधान्य; गाडीतच केला अल्पोपहार अन् पुन्हा लागले कामाला
सुजय विखेंना ‘तो’ गनिमी कावा येणार अंगलट.? हायकोर्टाने दिले कठोर आदेश
मला अक्षयसारखे मार्केटींग जमत नाही म्हणून मी मागे राहीलो; सुनील शेट्टीने व्यक्त केली खंत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.