..म्हणून राजेश खन्नाने स्वतःचे चित्रपट पाहणे बंद केले होते

राजेश खन्ना त्यांच्या काळातील सर्वात मोठे स्टार होते. त्यांच्यासारखे स्टारडम आजही कोणत्याही अभिनेत्याला मिळाले नाही. त्यामूळे त्यांचे यश खुप खास होते. त्यांचे खरे नाव जतिन खन्ना होते. पण फिल्म इंडस्ट्रीने त्यांचे नाव राजेश खन्ना ठेवले होते.

८० च्या दशकात राजेश खन्ना हे नाव घराघरात जावून पोहोचले होते. लोकं त्यांच्या नावावरुन आपल्या मुलांची नावे ठेवत होती. त्यांचे स्टारडम पाहता त्यांना बॉलीवूडचे पहीले सुपरस्टार बोलले जाते. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट केले आहेत.

त्यांना एका पाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ज्यामूळे त्यांनी त्यांच्या नावावर अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. आजही त्यांनी बनवलेले रेकॉर्ड कोणीही मोडू शकले नाही. त्यांनी १०० पेक्षा अधिक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

त्यांना खुप कमी वेळात खुप जास्त यश मिळाले होते. म्हणून ते खुप आनंदी होते. फक्त यश पाहता त्यांनी करिअरमध्ये अनेक चढ उतार देखील पाहीले होते. पण एका काळानंतर त्यांच्या करिअरला उतरते वळण लागले. त्यांचे करिअर परत कधीच यशाच्या पायऱ्या चढू शकले नाही.

करिअरमधला हा काळ राजेश खन्नासाठी खुप वाईट होता. त्यांनी या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी खुप प्रयत्न केले. पण त्यांना यश मिळाले नाही. त्यांचे करिअर फ्लॉप होत गेले. चित्रपट बॉक्स ऑफिसवर पडत होते. हे सगळं पाहून ते खुप दुखी झाले होते.

अशा परिस्थितीमध्ये त्यांनी अंधश्रद्धा पाळायला सुरुवात केली. त्यांनी अनेक महाराज आणि गुरुजींना भेटायला सुरुवात केली. त्यांनी करिअरचे सगळे निर्णय गुरुजींना विचारुन घ्यायचे असे ठरवले होते. ही गोष्ट अनेक लोकांना मान्य नव्हती. त्यांना ही अंधश्रद्धा वाटत होती.

पण राजेश खन्ना मात्र त्यांच्या निर्णयावर ठाम होते. राजेश खन्ना कोणत्या चित्रपटांमध्ये काम करणार याचा निर्णय गुरुजी घेत होते. एवढेच नाही तर त्यांनी स्वत चे चित्रपट पाहणे देखील बंद केले होते. राजेश खन्ना कधीच त्यांचे चित्रपट टिव्हीवर पाहत नव्हते.

घरातील टिव्हीवर स्वत चा चित्रपट लागला तर राजेश खन्ना टिव्ही बंद करायचे. ते कधीच स्वत चे चित्रपट पाहत नव्हते. शेवटच्या दिवसांपर्यंत त्यांनी हा नियम पाळला होता. एकदा काम केल्यानंतर ते स्वत चे चित्रपट पाहत नव्हते.

महत्त्वाच्या बातम्या –

राजेश खन्नाच्या ‘त्या’ सल्ल्यावर डिंपल कपाडियाला झाले होते हसू अनावर; वाचा पुर्ण किस्सा

एवढ्या वर्षांनंतर पद्मिनी कोल्हापूरेने केला खुलासा; ‘या’ कारणामुळे हिट चित्रपटाला दिला होता नकार

…म्हणून अनिल अंबानीचे स्थळ घेऊन ऐश्वर्या रायच्या घरी गेले होते अमिताभ बच्चन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.