कोण अमिताभ बच्चन? म्हणत राजेश खन्नाने केला होता अमिताभचा अपमान

राजेश खन्ना इंडस्ट्रीतील सर्वात मोठे सुपरस्टार होते. आजही त्यांच्यासारखे स्टारडम कोणालाही मिळाले नाही. चित्रपटांमध्ये येण्याअगोदरपासूनच राजेश खन्ना श्रीमंत होते. त्यांच्याकडे पैशांची कमी नव्हती.

त्यांचा जन्म एका श्रीमंत कुटूंबातील होता त्यामूळे त्यांना कसलीही कमी नव्हती. इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदरच ते करोडोंच्या संपत्तीचे मालक होते. त्यांचे खरे नाव जतिन खन्ना होते. ही गोष्ट खुप कमी लोकांना माहीती आहे.

राजेश खन्ना दिग्दर्शकांकडे चित्रपट मागायला जायचे त्यावेळी देखील महागडी गाडी घेऊन जायचे. त्यामूळे त्यांचा रुतबा खुप वेगळा होता. त्यांच्यासमोर इंडस्ट्रीतील मोठे मोठे कलाकार हार मानत होते. श्रीमंत असणारे खन्ना ज्यावेळी मोठे स्टार झाले. त्यावेळी त्यांचा स्वभाव खुप बदलला होता.

सुपरस्टार म्हणून राजेश खन्नाला सगळ्या देशाने डोक्यावर घेतले होते. त्यामूळे त्यांचा स्वभाव बदलत होता. यश आणि पैशांमध्ये राजेश खन्ना अनेकदा लोकांशी चुकीचे वागायचे. त्यामूळे लोकांची मने दुखवली जायची.

असाच काही किस्सा अमिताभ बच्चनचा आहे. करिअरच्या सुरुवातीला अमिताभ राजेश खन्नाला भेटायला गेले होते. त्यावेळी त्यांनी अमिताभचा अपमान केला होता. त्यामूळे अमिताभ खुप दुखी झाले आणि तिथून निघून गेले. जाणून घ्या पुर्ण किस्सा.

अमिताभ बच्चन फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवीन आले. तेव्हा त्यांना इंडस्ट्रीमध्ये काम मिळत नव्हते. कामासाठी त्यांनी खुप प्रयत्न केले. पण त्यांना यश मिळत नव्हते. म्हणून त्यांनी इंदिरा गांधीकडून पत्र लिहून आणले होते. ते पत्र नर्गिस यांच्यावर नावावर होते. अमिताभला काम मिळवून देण्याची जबाबदारी नर्गिस यांच्यावर होती.

नर्गिस यांनी अमिताभसाठी एका व्यक्तिची निवड केली होती. त्यांचे नाव ग्रोव्हर होते. ग्रोव्हर त्यांच्यासोबत ऑडिशनला जायचे आणि त्यांना इंडस्ट्रीमध्ये काम शोधायला मदत करायचे. निर्मात्यांसोबत मिटींगला ग्रोव्हर त्यांच्यासोबत असायचे. अमिताभला घेऊन ते अनेक दिग्दर्शकांना भेटायला जायचे.

एकदा ग्रोव्हर अमिताभला घेऊन एका स्टूडीओमध्ये गेले होते. त्याच ठिकाणी राजेश खन्ना त्यांच्या चित्रपटाची शुटींग करत होते. त्यामूळे ग्रोव्हरने अमिताभ राजेश खन्नाला भेटण्याची इच्छा आहे का असा प्रश्न केला. यावर अमिताभने हो मला त्यांना भेटायचे आहे. असे उत्तर दिले.

ज्यावेळी हे दोघे काकांना भेटण्यासाठी सेटवर गेले. त्यावेळी काकांनी अमिताभचा अपमान केला. त्यांनी कोण अमिताभ बच्चन? मी अशा नावाच्या कोणत्याही व्यक्तिला ओळखत नाही. असे सांगितले. हे ऐकून अमिताभ दुखी झाले.

राजेश खन्ना एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी गार्डला माझी परवानगी न घेता कोणालाही आत सोडायचे नाही. असा आदेश दिला. हे ऐकल्यानंतर तर अमिताभ आणखी दुखी झाले. त्यांना आयूष्यभर हा अपमान लक्षात राहणार होता.

ज्या अमिताभचा राजेश खन्नाने अपमान केला होता. पुढे जाऊन त्याच अमिताभने त्यांचे स्टारडम हिसकावून घेतले आणि बॉलीवूडचा सुपरस्टार झाला. त्यावेळी मात्र राजेश खन्नाला त्यांची चुक समजली आणि त्यांनी नंतर अमिताभची माफी मागितली होती.

महत्वाच्या बातम्या –

मला किस करशील का? चाहत्याच्या प्रश्नावर जान्हवी कपूरने दिले भन्नाट उत्तर

स्टारडम मिळाल्यानंतर ते मला विसरले, म्हणून अमिताभला त्यांना कृतघ्न समजतो – अभिनेते मेहमूद

सनी देओलमूळे धर्मेंद्रने बोनी कपूरला दिली होती धमकी; वाचा पुर्ण किस्सा

विरुष्काचे एअरपोर्टवरील फोटो व्हायरल; पहा वामिकाची पहिली झलक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.