राजेश खन्नाने शिव्यांची लाखोली वाहत मनोजकुमारच्या खाड खाड वाजवल्या; का चिडला होते काका?

फिल्म इंडस्ट्रीमध्ये कलाकारांमध्ये रोज भांडण होत असतात. अनेक कारणांमुळे कलाकार रोज एकमेकांसोबत वाद करत असतात. पण कधी कधी हा वाद खुप जास्त वाढतो आणि हातापायीवर जाऊन पोहोचतो. त्यामुळे शेवटी पोलिसांना येऊन हा वाद थांबवावा लागतो.

असाच काही किस्सा राजेश खन्ना आणि मनोज कुमारचा आहे. हे दोघेही बॉलीवूडचे खुप मोठे सुपरस्टार आहेत. दोघांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. अनेक वर्षे फिल्म इंडस्ट्रीमध्ये या दोघांचे राज्य होते.

राजेश खन्ना आणि मनोज कुमारमध्ये खुप चांगले नाते होते. अनेक वेळा हे दोघे एकत्र दिसायचे. पण एक वेळ अशी आली जेव्हा या दोघांमध्ये खुप मोठे भांडण झाले आणि या दोघांनी परत कधीच एकत्र काम केले नाही. जाणून घेऊया हा किस्सा.

ही गोष्ट आहे ८० च्या दशकातील. त्यावेळी डिंपल कपाडियाने राजेश खन्नासोबत लग्न केले होते. लग्नानंतर त्या अभिनय क्षेत्रापासून लांब गेल्या होत्या. त्यांनी चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले होते. ही गोष्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांना माहीती होती.

डिंपल कपाडिया घरामध्ये एकट्या होत्या. त्या रात्री राजेश खन्नाची वाट बघ बसल्या होत्या. तेव्हा त्यांना एक फोन आला. हा फोन मनोज कुमारने केला होता. डिंपलने फोन उचलला त्यावेळी मनोज कुमार म्हणाले की, ‘मी मनोज कुमार बोलत आहे. मला तुझ्यासोबत चित्रपट करायचा आहे. त्यामुळे तु मला आत्ता भेटायला हॉटेलवर ये’.

त्या वेळी रात्रीचे १२:३० वाजले होते. ही गोष्ट डिंपलला आवडली नाही. तिला खुप जास्त राग आला. तिने राजेश खन्ना घरी आल्यानंतर ही गोष्ट त्यांना सांगितली. राजेश खन्ना खुप जास्त चिडले. त्यांनी त्यांच्या मित्रांना फोन केला आणि घरी बोलवून घेतले.

त्यांच्या मित्रांनी त्यांना समजून सांगितले की, आत्ता एवढ्या रात्री त्यांच्या घरी जाणे योग्य नाही. आपण सकाळी त्यांच्या घरी जाऊ. पण राजेश खन्ना मात्र ऐकायला तयार नव्हते. ते रात्री एकटे मनोज कुमारच्या घरी निघाले.

त्यांनी मनोज कुमारच्या घरासमोर जाऊन शिव्या द्यायला सुरुवात केली. पण मनोज कुमार मात्र घरातून बाहेर आले नाहीत. धर्मेंद्रने हे सगळं काही बघितलं आणि राजेश खन्नाला थांबवले. आत्ता खुप रात्र झाली आहे. आपण सकाळी मनोज कुमारच्या घरी जाऊ आणि बोलू असे त्यांना सांगितले.

दुसऱ्या दिवशी सकाळी राजेश खन्ना धर्मेंद्रला घेऊन मनोज कुमारच्या घरी गेले. त्यांनी मनोजला पाहताच क्षणी त्यांना शिव्या द्यायला सुरुवात केली. एवढेच नाही तर त्यांनी मनोज कुमारच्या कानाखाली वाजवली. त्यांना मारायला सुरुवात केली.

खुप वेळ या दोघांमध्ये भांडण सुरू होते. शेवटी धर्मेंद्रने राजेश खन्नाला थांबवले आणि हा वाद संपवायला सांगितला. राजेश खन्ना ऐकत नव्हते म्हणून त्यांनी पोलिसांना बोलवले. त्यानंतर या दोघांमधला वाद थांबला.

राजेश खन्नाने मनोज कुमारला डिंपल कपाडियाची माफी मागायला सांगितले. त्यांनी माफी मागितली आणि वाद थांबला. पण या प्रकरणानंतर राजेश खन्ना आणि मनोज कुमारची मैत्री मात्र तुटली. त्या दोघांनी कधीच एकत्र काम केले नाही आणि आयुष्यात कधी एकमेकांशी बोलले नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या –

बापरे! परत माझ्यासोबत असा वागला तर बघ; जॅकी श्रॉफने अनिल कपूरला दिली होती धमकी

‘सोनपरी’ मालिकेतील फ्रुटी झाली आहे मोठी; दिसते खुपच सुंदर आणि ग्लॅमर्स पहा फोटो

हॉट आणि ग्लॅमर्स आमिषा पटेलने सांगितले लग्न न करण्यामागचे कारण

माधुरी दिक्षीत तुझी खाजगी प्रॉपर्टी नाही; जॅकी श्रॉफने अनिल कपूरला सुनावले; वाचा पुर्ण किस्सा..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.