त्या गोष्टीचा सूड राजेश खन्नांनी उगवला; करोडोंच्या संपत्तीतील फुटकी कवडीसुद्धा डिंपलला दिली नाही

राजेश खन्ना हे बॉलीवूडमधले खुप मोठे नाव आहे. आज ते या जगात नसले तरी त्यांचे चित्रपट आणि त्यांच्या आठवणी नेहमीच आपल्यासोबत आहेत. त्यांनी अनेक वर्षे बॉलीवूडवर राज्य केले आहे. राजेश खन्नाचे अनेक चित्रपट गोल्डन जुब्ली आहेत.

राजेश खन्नाने खुप कमी वेळात बॉलीवूडमध्ये यश मिळवले होते. सुपरस्टार म्हणजे नक्की काय असते. या गोष्टीची जाणीव राजेश खन्नाने करून दिली होती. अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करणारे राजेश खन्ना करोडोच्या संपत्तीचे मालक होते.

ही सर्व संपत्ती त्यांनी त्यांच्या मुलींच्या नावावर केली आहे. यातील थोडीही संपत्ती त्यांनी त्यांच्या पत्नी डिंपल कपाडियाच्या नावावर केली नाही. यामागे देखील अनेक कारणे आहेत. जाणून घेऊया यामागचं नेमकं कारण.

राजेश खन्नाने त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांच्या संपत्तीचे काय करायचे याचा विचार केला होता. त्यांनी जावई अक्षय कुमार, मुलगी ट्विंकल आणि रिंकी खन्ना यांच्यासमोर इच्छा पत्राचे वाचन केले होते. त्यांनी इच्छा पत्रात स्पष्टपणे लिहिले होते की, त्यांच्या संपत्तीतील थोडाही भाग ते पत्नी डिंपलला देणार नाहीत.

काही वर्षांपूर्वी राजेश खन्नाने डिंपलला घरा बाहेर काढले होते. त्यामुळे हे प्रकरण काही दिवस कोर्टात देखील गेले होते. पण तरीही राजेश खन्नाने त्यांचा निर्णय बदलला नाही. ते शेवटपर्यंत त्यांच्या निर्णयावर ठाम होते. त्यांचे डिंपलवर खुप प्रेम होते. पण या दोघांच्या भांडणांमूळे त्यांनी डिंपलला काहीही दिले नाही.

राजेश खन्नाची एकूण प्रॉपर्टी हजार करोड रुपयांची होती. ही सर्व संपत्ती त्यांनी दोन्ही मुलींमध्ये वाटली. पण पत्नी डिंपलला मात्र या संपत्तीचा थोडाही हिस्सा दिला नाही. राजेश खन्नाने त्यांच्या निधनाच्या काही दिवसांपूर्वीच मृत्यूपत्र बनवून ठेवले होते.

१९७३ मध्ये राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया या दोघांनी लग्न केले होते. या दोघांचे लग्न लव्ह मॅरेज होते. या दोघांच्या लग्नाच्या वेळी डिंपल बॉलीवूडमध्ये नवीन होत्या. तर त्यावेळी राजेश खन्ना बॉलीवूडचे सुपरस्टार होते.

लग्नानंतर काही दिवसांनी या दोघांमध्ये वाद सुरू झाले. त्यामुळे या दोघांचे नाते बिघडत होते. या दोघांना ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना या दोन मुली झाल्या. मुलींच्या जन्मानंतरही या दोघांचे भांडण थांबत नव्हते. दिवसेंदिवस राजेश खन्ना आणि डिंपल कपाडियाचे भांडण वाढत होते.

शेवटी या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. हे दोघे वेगळे झाले. पण या दोघांनी कधीच घटस्फोट घेतला नाही. घटस्फोट न घेता हे दोघे वेगळं राहत होते. या सर्व कारणांमुळे राजेश खन्नाने त्यांच्या करोडोच्या संपत्तीमधून डिंपलला काहीही दिले नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

…म्हणून मीनाक्षी शेषाद्रीने लग्नानंतर बॉलीवूड सोडले

…म्हणून ऐश्वर्या राय नेहमी आराध्याचा हात पकडून असते

अलका कुबलच्या मुलींचे फोटो पाहून थक्क व्हाल; सौंदर्यात मोठमोठ्या अभिनेत्रींना देतात टक्कर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.