जिगरी दोस्त राजेश खन्ना आणि यश चोप्राची मैत्री तुटण्यामागे आहे ‘हे’ कारण

राजेश खन्ना बॉलीवूडचे सुपरस्टार आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यांच्या नावाने अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत होते. पण त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांच्यासोबत कोणीही नव्हते.
त्यांच्या सर्वात चांगल्या मित्रांनी देखील त्यांची साथ सोडली होती.

यश चोप्रा त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला त्यांचे मोठे भाऊ बी.आर. चोप्रासोबत काम करत होते. त्यांनी बी आर चोप्राच्या प्रोडक्शनमध्ये अनेक हिट चित्रपट दिले होते. १९७२ त्यांनी पामेलीसोबत लग्न केले. लग्नानंतर त्यांनी नवीन प्रोडक्श हाऊसची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी ‘यश राज फिल्म्स’ नावाने नवीन प्रोडक्शन हाऊस सुरू केले. पण या प्रोडक्शनमध्ये लोकांनी पैसे लावायला नकार दिला. कारण यश चोप्रा प्रोडक्शनमध्ये नवीन होते. त्यामुळे लोकांना त्यांचे नुकसान होईल असे वाटू लागले.

यश चोप्राने त्यांच्या प्रोडक्श हाऊसमध्ये ‘दाग’ या चित्रपटाची घोषणा केली. पण या चित्रपटासाठी लोकं पैसे लावायला तयार नव्हते. म्हणून यश चोप्रा खुप टेन्शनमध्ये होते. अशा परिस्थितीमध्ये राजेश खन्ना त्यांच्या मदतीसाठी पुढे आले.

राजेश खन्नाने काहीही पैसे न घेता दाग चित्रपट साइन केला. राजेश खन्ना बॉलीवूडचे सुपरस्टार होते. त्यांच्या नावाने अनेक चित्रपट हिट व्हायचे. म्हणून निर्माते अनेक चित्रपट करायला तयार व्हायचे. यश चोप्रासोबत पण तसेच काही झाले.

राजेश खन्ना यश चोप्राच्या चित्रपटामध्ये काम करत आहेत. ही गोष्ट लोकांना समजली. त्यामुळे अनेक निर्मात्यांनी दाग चित्रपट बनवायला मदत केली. कारण त्यांना माहीती होते की, राजेश खन्नाचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होणार आहे.

दाग चित्रपट रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. लोकांनी या चित्रपटाला पसंत केले होते.असे बोलले जात होते की, राजेश खन्नाने यश चोप्राची मदत केली. म्हणून यश चोप्राचे करिअर सुरू झाले. ही गोष्ट यश चोप्राने देखील मान्य केली होती.

यश चोप्रा नेहमी म्हणायचे की, ‘काकांमूळे मी बॉलीवूडमध्ये टिकून आहे. नाही तर माझं करिअर कधीच संपलं असत’. राजेश खन्नामूळे यश चोप्राचे करिअर वाचले होते. पण यश चोप्रामूळे मात्र राजेश खन्नाचे करिअर खराब झाले होते.

राजेश खन्ना आणि यश चोप्राने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. या दोघांची मैत्री खुप चांगली होती. पण यश चोप्राच्या एका चुकीमुळे या दोघांची मैत्री आणि राजेश खन्नाचे करिअर दोन्ही खराब झाले होते. जाणून घेऊया हा पूर्ण किस्सा.

यश चोप्राने अनेक हिट चित्रपट दिले होते. म्हणून त्यांच्या चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी अनेक कलाकार तयार असायचे. ८० च्या दशकामध्ये यश चोप्रा ‘दिवार’ चित्रपटावर काम करत होते. या चित्रपटाची स्क्रिप्ट सलीम जावेद लिहित होते.

सलीम जावेद आणि यश चोप्रा खुप चांगले मित्र होते. यश चोप्राने या चित्रपटामध्ये मुख्य अभिनेता म्हणून राजेश खन्नाला घेतले होते. पण सलीम खान आणि राजेश खन्नामध्ये काही खास मैत्री नव्हती. म्हणून या चित्रपटामध्ये सलीम यांना राजेश खन्ना मुख्य हिरो म्हणून नको होते.

सलीम खानने ही गोष्ट यश चोप्राला सांगितली. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चनला घेण्याचा सल्ला सलीम यांनी यश चोप्राला दिला. अमिताभचा त्यावेळी ‘झंजीर’ चित्रपट सुपरहिट झाला होता. त्यामुळे अमिताभ स्टार झाले होते.

सुरुवातीला यश चोप्राने या गोष्टीला नकार दिला. पण अमिताभचे स्टारडम बघून यश चोप्राने या चित्रपटासाठी अमिताभला फायनल केले. ही गोष्ट ज्यावेळी राजेश खन्नाला समजली त्यावेळी त्यांना खुप राग आला. ते यश चोप्रावर खुप चिडले.

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. राजेश खन्नाचे करिअर खुप वाईट सुरू होते. त्यांनी दिवार चित्रपट केला असता. तर त्यांचे करिअर नक्कीच चांगले झाले असते. असे बोलले जात होते की, यश चोप्रामूळे राजेश खन्नाचे करिअर खराब फ्लॉप झाले.

एका मुलाखतीमध्ये राजेश खन्ना म्हणाले होते की, ‘ यश चोप्राला मी त्यांच्या वाईट दिवसांमध्ये मदत केली होती. पण त्यांनी मात्र माझ्या वाईट दिवसांमध्ये माझी सोबत सोडून दिली होती. मी मैत्री निभावली होती. पण त्यांनी मात्र मैत्री निभावली नाही’.

महत्त्वाच्या बातम्या –

दिलफेक सैफ अली खानला प्रीती झिंटामुळे खावा लागला होता बायको अमृताचा मार

रजनीकांत आणि माधुरी दीक्षितची जवळीक वाढत होती; म्हणून दिग्दर्शकाने चित्रपटाची स्क्रिप्ट बदलली

म्हणून आई अमृता साराला म्हणाली होती तु तर भिकारी दिसत होतीस

मालिकेत सावळी दिसणारी ‘ही’ अभिनेत्री खऱ्या आयुष्यात दिसते खुपच सुंदर; पहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.