चार वर्ष वेगळे राहिल्यानंतर राजेश खन्ना आणि डिंपल कपाडियाची झाली होती ‘अशी’ अवस्था

राजेश खन्ना बॉलीवूडचे पहीले सुपरस्टार होते. त्यांच्यासारखे स्टारडम दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्याच्या नशिबात अजूनही आले नाही. म्हणूनच बॉलीवूडच्या सुपरस्टारचा ताज आजही त्यांच्या नावावर आहे. चित्रपटांसोबतच ते त्यांच्या वैयक्तिक आयूष्यामूळे देखील लोकांसाठी चर्चेचा विषय होते.

राजेश खन्नाने अभिनेत्री डिंपल कपाडियासोबत लग्न केले होते. दोघांचे लग्न त्याकाळी चर्चेचा विषय होता. त्यामागे अनेक कारण होती. अनेकांचे म्हणणे होते राजेश खन्ना गर्लफ्रेंडला जळवण्यासाठी डिंपलसोबत लग्न करत होते. लोकांना वाटत होते हे लग्न जास्त काळ टिकू शकणार नाही.

यासोबतच आणखी एक कारण होते ज्यामूळे हे लग्न खुप जास्त चर्चेत आले होते. ते कारण म्हणजे राजेश खन्ना आणि डिंपलमधले वयाचे अंतर. दोघांमध्ये अनेक वर्षांचे अंतर होते. डिंपल काकांपेक्षा १५ वर्षांनी छोट्या होत्या. हिच गोष्ट अनेकांना समजली नाही.

१९७२ मध्ये दोघांनी लग्न केले. यांच्या लग्नाचा परिणाम राज कपूरच्या ‘बॉबी’ चित्रपटावर देखील झाला होता. पण रिलीजनंतर चित्रपट हिट झाला. लग्नानंतर राजेश खन्ना आणि डिंपल जास्त वेळ एकत्र राहिले नाहीत.

१० वर्षांच्या आतच दोघांमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली. नवरा बायकोमधील भांडण वाढू लागली त्यावेळी डिंपल कपाडिया राजेश खन्नाचे घर सोडून आई वडीलांच्या घरी राहू लागली. त्यामूळे अनेक दिवस दोघे वेगळे राहिले.

दोघांमध्ये कितीही भांडण झाली तरी राजेश खन्ना आणि डिंपल घटस्फोट घेतला नाही. त्यासोबतच दोघांना ट्विंकल आणि रिंक्की या दोन्ही मुली होत्या. त्यामूळे त्यांना घटस्फोट घेणे सोपे नव्हते. वेगळे राहत असले तरी त्यांनी कधीच घटस्फोट घेतला नाही.

अनेक वर्ष दुर राहिल्यानंतर जेव्हा परत एकदा दोघांची भेट झाली. त्यावेळी त्यांची परिस्थिती खुप वेगळी होती. दोघांना काय बोलावे ते कळत नव्हते. चार वर्ष एकमेकांपासून दुर राहिल्यानंतर दोघांना एकदा भेटण्याची संधी भेटली. त्यावेळी त्यांच्यामध्ये जास्त बोलणे झाले नाही.

कारण चार वर्ष वेगळे राहिल्यानंतर दोघे एका चित्रपटासाठी एकत्र आले होते. त्यांना चित्रपटात काम करायचे होते. म्हणून त्यांची भेट झाली होती. राजेश खन्ना त्यावेळी जय शिव शंकर चित्रपट बनवत होते. हा मल्टी स्टारर चित्रपट होता.

डिंपल कपाडियाने लग्नानंतर परत एकदा करिअरवर लक्ष द्यायला सुरुवात केली होती. ज्यामूळे त्यांनी काकांसोबत चित्रपटात काम करण्याची इच्छा जाहिर केली. राजेश खन्नाने देखील त्यांची ही अपेक्षा पुर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी डिंपलला जय शिव शंकरा चित्रपटात घेतले.

याच चित्रपटाची चर्चा करण्यासाठी राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया चार वर्षांनंतर भेटले होते. पण तेव्हा दोघांमध्ये जास्त बोलणे झाले नाही. कारण ती परिस्थिती खुप वेगळी होती. डिंपल राजेश खन्नाच्य डोळ्यात डोळे टाकून बोलू शकत नव्हत्या. खुप वर्षांनी त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला होता.

महत्वाच्या बातम्या –
लक्ष्मीकांत बेर्डे विनोद करताना या महिलेचा घ्यायचे आदर्श, पहा लक्ष्याची सगळ्यात दुर्मिळ मुलाखत
मुलाचे नाव रेखासोबत जोडल्या गेल्यामूळे सुनील दत्तची उडाली होती झोप; वाचा पुर्ण किस्सा
मिर्झापुर सीरीजमधील अभिनेत्यावर आली वाईट वेळ? अक्षरश रस्त्यावर लाडू विकतोय
रणबीर कपूरसाठी कतरिनाने फक्त एक मेसेज करुन सलमान खानसोबत केले ब्रेकअप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.