राजेंद्र कुमारला बघण्यासाठी पागल झाले होते लोकं; पोलिसांनी लाठीचार्ज करुन सांभाळली होती परिस्थिती

फिल्म इंडस्ट्री आणि राजकारण यांचे नाते खुप जुने आहेत. बॉलीवूडचे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री अभिनयात यशस्वी झाल्यानंतर राजकारणात प्रवेश करतात. तर अनेक वेळा राजकारणी नेते त्यांच्या कामासाठी अभिनेत्यांचा वापर करुन घेतात. असे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. यातलाच एक किस्सा आपण आज जाणून घेणार आहोत.

बॉलीवूडचे जुब्ली कुमार म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र कुमार आज आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या आठवणी आणि चित्रपट सदैव आपल्यासोबत असणार आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अजरामर स्थान निर्माण केले आहे. आजही त्यांचे चाहते आहेत.

हा किस्सा आहे १८८६ चा. त्यावेळी राजेंद्र कुमार स्टार होते. त्यांच्या स्टारडम खुप जास्त होते. म्हणूनच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकींमध्ये प्रचारासाठी राजेंद्र कुमारला निवडण्यात आले होते. नाशिकच्या मालेगावमध्ये त्यांच्यासाठी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते.

राजेंद्र कुमार देखील या सभेसाठी तयार होते. त्यांनी सभेतील भाषणासाठी सगळी तयारी केली होती. सभेची सगळी तयारी झाली होती. सभा सुरु होण्या अगोदर राजेंद्र कुमार तिथे पोहोचले होते. पण तिथे पोहोचल्यानंतर त्यांना गाडीच्या बाहेर निघता आले नाही आणि ते तिथून परत आले.

कारण सभेच्या ठिकाणी राजेंद्र कुमारला पाहण्यासाठी लाखो लोकं जमा झाले होते. त्यांचा चाहता वर्ग त्यांना पाहण्यासाठी आला होता. ज्या वेळी राजेंद्र कुमारची गाडी त्या ठिकाणी पोहोचली. लोकं एकत्र जमा झाली. मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहून राजेंद्र कुमार गाडी उतरले नाही. ते परत हॉटेलवर गेले.

राजेंद्र कुमारची गाडी परत गेल्यामूळे लोकं चिडले. शेवटी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीसांना लाठीचार्ज कारावा लागला. हे सगळं काही बघून राजकीय पार्टीचे लोकं राजेंद्र कुमारच्या घरी गेले आणि त्यांना या सगळ्या परिस्थितीसाठी जबाबदार ठरवले. त्यांना बोलायला सुरुवात केली.

हे सगळं काही राजेंद्र कुमार खुप चिडले आणि त्यांनी एका व्यक्तिला मारायला हात उचलाल. पण त्यांचा हात चुकून काचेच्या खिडकीवर गेला आणि ते जखली झाले. त्यांना लगेच डॉक्टरकडे नेण्यात आले. खुप वेळ पार्टीतील लोकांसोबत वाद झाल्यानंतर राजेंद्र कुमार परत एकदा सभेत जायला तयार झाले.

या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेत पार्टीतील लोकांनी अफवा पसरवली की, विरोधी पक्षनेत्यांनी राजेंद्र कुमारवर जीवघेणा हल्ला केला. त्यामूळे पहीली सभी होऊ शकली नाही. हे ऐकल्यानंतर राजेंद्र कुमारचे फॅन पागल झाले. त्यांच्या दुसऱ्या सभेला पहीले पेक्षा जास्त गर्दी झाली.

ज्यावेळी जखमी हात घेऊन राजेंद्र कुमार सभेला गेले त्यावेळी लोकं त्यांना पाहून पागल झाले. गर्दी वाढतच गेली. अशा प्रकारे राजेंद्र कुमारची सभा पार पडली. प्रसिद्धीसाठी त्यांनी खोट्या अफवा पसरवल्या होत्या. पण त्याचा त्यांना मोठा फायदा झाला.

महत्वाच्या बातम्या –
करोडोंच्या संपत्तीचा मालक झाला तरी ‘या’ व्यक्तीला नाही विसरला शाहरूख; आजही ते दिवस आठवल्यावर..
विवाहीत अभिनेता रवी किशनच्या प्रेमात पडली होती नगमा; रवीच्या पत्नीला समजल्यावर मात्र…
‘तिरंगा’मध्ये नाना पाटेकर ऐवजी दिसले असते रजनीकांत; पण ‘या’ कारणामुळे दिला नकार
साऊथ इंडस्ट्रीतील ‘या’ अभिनेत्यामूळे ५० वर्षांची तब्बू आजही आहे अविवाहीत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.