वादळामुळे पश्चिम बंगालमध्ये वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. यात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सचा संघ आयपीएल २०२२ च्या पहिल्या क्वालिफायरसाठी मुंबईहून कोलकाता येथे रवाना झाला, तेव्हा त्यांच्या आकाशात उडणाऱ्या विमानालाही वादळाचा सामना करावा लागला.(Rajasthan Royals, Storm, Aircraft)
राजस्थानच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आकाशात उडताना विमानातील लाईट गेल्याचे दिसत आहे. यादरम्यान खेळाडू घाबरून भाई लैंड कर असे म्हणताना दिसत आहेत. रविचंद्रन अश्विनच्या २३ चेंडूत नाबाद ४० धावा केल्याच्या बळावर राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जवर पाच विकेट्सने विजय मिळवून आयपीएल २०२२ लीग टप्पा पूर्ण केला.
https://twitter.com/rajasthanroyals/status/1528222666426945537?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1528222666426945537%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.naidunia.com%2Fsports%2Fipl-news-ipl-2022-rajasthan-royals-team-plane-stuck-in-kal-baisakhi-while-coming-from-mumbai-to-kolkata-video-viral-7537446
२४ मे रोजी कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर क्वालिफायर १ मध्ये त्यांचा सामना गुजरात टायटन्सशी होईल. जेव्हा RR संघ प्लेऑफसाठी मुंबई ते कोलकाता प्रवास करत होता, तेव्हा त्यांना नैसर्गिक कारणांमुळे घडलेल्या विचित्र अनुभवाला सामोरे जावे लागले.
संघातील एक खेळाडू भाई लैंड कर असे ओरडताना ऐकू येत आहे, कारण विमानात धुके पसरले होते आणि नंतर लाईट बंद झाल्याने खेळाडू घाबरले होते. कोलकातामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. व्हिडिओमध्ये विजेचा आवाजही ऐकू येतो. रिपोर्ट्सनुसार, ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहत होते. पावसापूर्वी कोलकात्यात ढगांचे दाट आच्छादन होते. ‘सिटी ऑफ जॉय’मध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.
जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि अर्शदीप यांची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली आहे. दोघांना प्रथमच भारतीय संघात स्थान मिळाले आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे.
केएल राहुल संघाचा कर्णधार असेल. हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिकचे पुनरागमन झाले आहे. दुसरीकडे संजू सॅमसन आणि राहुल त्रिपाठी यांना संधी मिळालेली नाही. सनरायझर्स हैदराबादच्या राहुलने चालू आयपीएलमध्ये ४१३ धावा केल्या आहेत. तर सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थानने प्लेऑफमध्ये प्रवेश केला.
महत्वाच्या बातम्या-
गुजरात आणि राजस्थानमधील एलिमीनेटर सामना रद्द होण्याच्या मार्गावर, धक्कादायक कारण आले समोर
मी अनेक रात्री दूध आणि ब्रेड खावून घालवल्या पण, राजस्थानच्या खेळाडूला अश्रु अनावर
रोहितच्या वाढदिवसाला मुंबईने राजस्थानवर मिळवला दणदणीत विजय, ८ पराभवानंतर जिंकला पहिला सामना
मुंबईच्या पठ्ठ्याने ३३ चेंडूत कुटल्या ६१ धावा, तरीही गमावला सामना; राजस्थानने अशी पलटवली बाजी