राजस्थानच्या जोधपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जोधपूरमधील(Jodhpur) दोन गटांमध्ये झेंडा लावण्यावरून सोमवारी वाद झाला होता. यानंतर दगडफेक देखील झाली होती. पोलिसांनी या प्रकरणात काही संशयितांना ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर आज देखील दोन गटांमध्ये हाणामारी झाली आहे. सध्या या परिसरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.(rajsthan jodhpur fight between two groups for loudspeakers and flags)
मिळालेल्या माहितीनुसार, जालोरी गेट परिसरात दोन गटांमध्ये झेंडा लावण्यावरून आणि लॉउडस्पीकरवरून वाद झाला होता. या वादानंतर दोन गटांमध्ये हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच भाजप आमदाराच्या घराबाहेर जाळपोळ करण्यात आली आहे. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या.
प्रशासनाकडून जोधपूरमधील दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. ४ मेच्या रात्रीपर्यंत हा कर्फ्यू सुरू राहणार आहे. सोमवारी रात्री म्हणजेच ईदच्या पूर्वसंध्येला हा गोंधळ सुरू झाला. हिंसाचाराच्या घटनेनंतर राजस्थान सरकारने तातडीने कारवाई केली आहे. सीएम गेहलोत यांनी या प्रकरणी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.
यामध्ये पोलीस आणि प्रशासन विभागातील अनेक उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या घटनेनंतर भाजप खासदार राज्यवर्धन सिंह राठोड यांनी राजस्थान सरकारवर निशाणा साधला आहे. गेहलोत सरकार एका समुदायाला खूश करण्याचा प्रयत्न करत आहे. राजस्थान तालिबान बनले आहे आणि सरकार औरंगजेबी निर्णय घेत आहे”, अशी टीका भाजप खासदार राज्यवर्धन सिंह राठोड यांनी केली आहे.
माल्ल्या माहितीनुसार, मुस्लिमबहुल परिसर असलेल्या जालोरी गेट परिसरात ईदच्या आदल्या रात्री झेंडा लावण्यात आला. तिथे वर्षानुवर्षे अशाप्रकारे झेंडा लावण्यात येतो. यासोबतच तेथे लाऊडस्पीकरही लावण्यात आला होता. त्यानंतर काही हिंदू संघटनेशी संबंधित लोकांनी तो झेंडा खाली उतरवला. त्या ठिकाणी परशुराम जयंतीच्या दिवशी भगवा ध्वज लावण्यात आला होता, असे हिंदू संघटनांचे म्हणणे आहे.
या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. या तणावाचे रूपांतर हिंसाचारात झाले. यावेळी काही लोकांनी दगडफेक आणि जाळपोळ केली आहे. तसेच अनेक वाहनांच्या काचा देखील फोडण्यात आल्या आहेत. या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस पथके तैनात करण्यात आली आहे. या हिंसाचारानंतर परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
मोठी बातमी! अखेर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, अजामीनपात्र गुन्हा असल्याने तुरूंगात जावे लागणार
मनसेच्या १५,००० कार्यकर्त्यांना नोटीस; मुंबई सोडण्याचे आदेश, तेढ निर्माण करणारांवर कठोर कारवाईचा इशारा
“स्वतःचा भाऊ मुख्यमंत्रीपदावर बसलेला पहावत नसल्याने राज ठाकरेंचा थयथयाट”