Share

अरे देवा! वडिलांच्या मृत्यूनंतर तीन वर्षांच्या चिमुकलीवर आली कुटुंबाची जबाबदारी, वाचा नेमकं काय घडलं..

Pagadi-vidhi-.j

राजधानीतील बागरूजवळील मोहनपुरा गावात एका प्रथा आहे. या प्रथेमध्ये व्यक्तीच्या डोक्यावर पगडी बांधून त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी सोपवण्यात येते. मोहनपुरा गावात असा पगडी विधी झाला की तिथे उपस्थित कोणालाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. या विधीमध्ये पंच पटेलांनी तीन वर्षांच्या निष्पाप मुलीच्या डोक्यावर फेटा बांधला.(rajasthan 3 year old girl take responsibility of family)

तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सर्व जणांना अश्रू अनावर झाले. अशाप्रकारे कोणाच्याही डोक्यावर पगडी बांधण्याची वेळ येऊ नये, अशी प्रार्थना सगळे करत होते. मोहनपुरा येथील वडिलांच्या मृत्यूनंतर समाजातील पंच पटेलांनी तीन वर्षांच्या निष्पाप मुलीच्या डोक्यावर फेटा बांधून कुटुंबाची जबाबदारी सोपवली.

हसण्या-खेळण्याच्या वयात चिमुकलीच्या डोक्यावर फेटा बांधला गेल्यामुळे लोक भावुक झाले. मोहनपुरा गावामधील सुनील टोडावता यांचा आकस्मिक निधन झाले. त्यांना एकुलती एक मुलगी आहे. अनम असे त्या मुलीचे नाव आहे. अनम फक्त तीन वर्षांची आहे. सुनील टोडावता यांना एकुलती एक मुलगी असल्याने पंच पटेलांनी अनमला पगडीचा विधी करायला बसवले.

यानंतर समाजातील लोकांनी कुटुंबीय व नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विधी पार पाडला. यावेळी राजस्थान सरपंच संघाचे अध्यक्ष बंशीधर गढवाल, अनमचे आजोबा रामफूल शेरावत, आजी, माजी नगरसेवक गीता चौधरी शेरावत, माजी युवक काँग्रेसचे अध्यक्ष बागरू अशोक शेरावत, रामलाल शेरावत, जगदीश शेरावत, आजोबा रामपाल हरलदाल, प्रताप हरलदाल, आजोबा नराधम शेरावत आदी उपस्थित होते.

ही एक सामाजिक प्रथा आहे. या प्रथेचे पालन हिंदू, शीख यांच्यासह सर्व धार्मिक समुदाय करतात. या प्रथेनुसार, कुटुंबातील ज्येष्ठ पुरुषाच्या मृत्यूनंतर, पुढच्या पिढीतील सर्वात मोठ्या जिवंत मुलाच्या डोक्यावर विधीपूर्वक पगडी बांधली जाते. कारण पगडी हे या भागातील समाजात आदराचे प्रतीक आहे.

ज्याच्या डोक्यावर पगडी बांधली जाते, ती व्यक्ती कुटुंबाच्या सन्मानाची आणि कल्याणाची जबाबदारी घेते. पगडीचा विधी अंतिम संस्काराच्या चौथ्या दिवशी किंवा तेराव्या दिवशी केला जातो. एवढ्या लहान वयात चिमुकलीच्या डोक्यावर पगडी बांधली गेल्यामुळे त्या मुलीवर कुटुंबाची जबाबदारी सोपवण्यात आली. यामुळे पगडी विधीला उपस्थित असलेले लोक भावुक झाले.

महत्वाच्या बातम्या :-
इशान किशन ठरला लिलावातील सर्वात महागडा खेळाडू, किंमत ऐकून डोळे पांढरे होतील
‘जे पुरूष नियमितपणे पॉर्न पाहतात त्यांना किस करता येत नाही’, अभिनेत्रीचे वादग्रस्त वक्तव्य
“… लक्षात ठेवा आमचे सरकार पडणारही नाही आणि मी झुकणारही नाही, जय महाराष्ट्र!”

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now