बाॅलीवूड पुन्हा हादरले! पद्मभूषण विजेत्या बड्या संगीतकाराचे कोरोनाने निधन

नवी दिल्ली | शास्त्रीय संगीतातील राजन साजन जोडी तुटली आहे. ज्येष्ठ गायक राजन मिश्रा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. राजन मिश्रा यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावत चालली होती. अखेर आज ६:३० च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

७० वर्षीय राजन मिश्रा यांना दिल्लीतील सेंट स्टीफंस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही.

राजन मिश्रा भारतातील प्रसिध्द गायक होते. त्यांनी भारताच्या बाहेरही आपली कला सादर केली होती. श्रीलंकामधून १९७८ साली पहिला संगीताचा कार्यक्रम त्यांनी घेतला होता. त्यानंतर सिंगापुर, जर्मनी, ऑस्ट्रलिया, नेदरलँड, कतार, अमेरिका, फ्रान्स, बांग्लादेश अशा अनेक देशांमध्ये शास्त्रीय संगीत सादर केले होते.

२००७ साली भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. शास्त्रीय संगीतात राजन मिश्रा आणि साजन मिश्रा या भावांची जोडी प्रसिध्द होती. दोघेजण सोबत कला सादर करत होते. पुर्ण जगात त्यांचे नाव प्रसिध्द होते.

राजन मिश्रा यांच्या निधनाने संगीत क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. कोरोनामुळे अनेक राजकीय, सामाजिक, संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांनी जीव गमावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
शास्त्रीय संगीतातील राजन साजन जोडी तुटली; संगीतकार राजन मिश्रा यांचे कोरोनाने निधन
रुग्णांच्या मदतीला मंत्र्यांची मुलं सरसावली; कोणी मारतंय झाडू, तर कोणी उचलतंय गाद्या
काय सांगता! ट्विंकल खन्नामूळे अजय देवगनने वाजवली होती करिश्मा कपूरच्या कानाखाली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.