राजा, आमचं खूप नुकसान झालंय, शिक्षीकेचा राज ठाकरेंना फोन; राज म्हणाले काही काळजी करु नका

कोरोनाच्या काळात सर्वांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. लॉकडाऊन लागल्यामुळे नोकरीला असणाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वृद्धाश्रम, अनाथ आश्रम यांना पण मदत करणाऱ्यांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यापर्यँत मदत पोहोचली नाही.

तौकते वादळाने किनारपट्टीवरच्या घरांचे सर्वात मोठे नुकसान झाले. ९० वर्षीय शिक्षिका असणाऱ्या सुमन रणदिवे यांनी मदतीसाठी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. राज ठाकरे यांनी रणदिवे बाईंना फोन करून त्यांची चौकशी केली आहे.

सुमन रणदिवे यांनी अनेक राजकीय नेत्यांना शिक्षणाचे धडे दिले आहेत. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांना सुमन रणदिवे यांनी शिक्षणाचे धडे दिलेले आहेत.

मागे रणदिवे बाईंनी उद्धव ठाकरे यांना मदतीसाठी कॉल केला होता. त्यांनी मदतीसाठी त्यांच्याकडे मागणी केली होती. सुमन रणदिवे बाईंच्या पाटील आधी नियतीने हिरावून घेतले, नंतर पुत्रप्रेमाचे छप्पर पण त्यांच्या डोक्यावरून काढून घेतले.

सध्या त्या वसईतील सत्पाळा गावातील “न्यू लाईफ फाऊंडेशन” या वृद्धाश्रमात वास्तव्य करत आहेत. या वृद्धाश्रमाला तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसला. त्यांनी मदतीसाठी उद्धव ठाकरेंना पण पत्र लिहिले होते.

वृद्धाश्रमाची बिकट अवस्था झाल्यानंतर रणदिवे बाईंनी त्यांच्या माजी विद्यार्थ्यांकडे मदतीसाठी मागणी केली होती. त्यांनी उद्धव ठाकरे, जयंत पाटील आणि राज ठाकरे यांच्याकडे मदत मागितली होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.