Share

राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना मोलाचा सल्ला; म्हणाले, ‘नशिबाने आपल्याला मुख्यमंत्रीपद…’

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे सुरु झालेलं सत्तानाट्य अखेर संपलं आहे. या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार कोसळलं आहे. शिंदे गटाला भाजपने पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजप यांचं नवीन सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते आणि आमदार एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत.(raj thakre tweet about eknath shinde)

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्रीपद मिळाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रक प्रसिद्ध करत एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे पत्रक सोशल मीडियावर शेअर केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या पत्रकामध्ये लिहिले आहे की, “श्री. एकनाथ शिंदेजी, आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. आपले अभिनंदन. खरंच मनापासून आनंद झाला. नशिबाने आपल्याला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे. आता ती स्वकर्तुत्वाने सिद्ध कराल ही आशा. आपण तरी बेसावध राहू नका. सावधपणे पाऊल टाका.”

https://twitter.com/RajThackeray/status/1542519365203279872?s=20&t=VBBhHDVkkuobcGzwSIe_Nw

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करताना त्यांना सावधपणे पावले टाकण्याचा सल्ला दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पत्रकार परिषदेत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली होती.

यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे सांगितले होते. पण अचानक देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार असल्याची माहिती समोर आली होती. देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावं. त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं, अशी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची इच्छा असल्याचे भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सांगितले होते.

त्यानंतर अमित शाह यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याची माहिती दिली होती.देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येत होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केल्यानंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार झल्याचे सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या :-
उद्धव ठाकरेंचे निरोपाचे शेवटचं भाषण तुमच्या पोरा बाळांना दाखवा, कारण…
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यामागे ‘धर्मवीर’ चित्रपटाचा मोठा हात; चित्रपटात नेमकं असं काय होतं वाचा सविस्तर
आधी नकार, मग होकार! मोदींनी फोन करताच फडणवीसांनी नमतं घेतलं; वाचा यामागील इनसाइड स्टोरी

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now