मनसे पक्षाकडून पुण्यातील सर्व मंदिरांमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी मनसे पक्षाकडून जोरदार तयारी देखील केली जात होत होती. अनेक हिंदू संघटनांनी या महाआरतीसाठी मनसे पक्षाला पाठिंबा दर्शवला होता. यादरम्यान पुण्यातील महाआरतीचा निर्णय मनसे(MNS) पक्षाकडून मागे घेण्यात आला आहे.(raj thakre take decison about pune temple mahaaarti )
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या संदर्भात एक पत्रक सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पत्रकामधून राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांना ईदमुळे महाआरती न घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच भोंग्याचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे, असे देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकामधून सांगितले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकामध्ये लिहिले आहे की, “उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही.”
राज ठाकरे यांनी पत्रकामध्ये पुढे लिहिले आहे की, “भोंग्याचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं; हे मी उद्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन”, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकामध्ये म्हंटले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे पत्रक त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहे.
अनेकांनी राज ठाकरे यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. ४ तारखेनंतर जिथे जिथे अजान होणार तिथे तिथे दुप्पट आवाजात लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावू, असं विधान राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत केलं होतं.
यानंतर राज्यातील गृहखातं ऍक्टिव्ह मोडमध्ये आलं आहे. राज ठाकरे यांच्या भाषणामध्ये काही प्रक्षोभक बाबी आढळल्यास त्यांच्यावर गृहविभागाकडून कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे यांनी राज्यातील जनतेला कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले.
महत्वाच्या बातम्या :-
पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पतीने उचललं टोकाचं पाऊल; वाचून बसेल जबर धक्का
..त्यामुळे मी दाक्षिणात्य चित्रपटात काम करावे अशी त्याची इच्छा होती, जॅकलीनने ईडीसमोर दिली कबूली
“फुलेंनी शिवरायांची समाधी शोधली तेव्हा टिळक १३ वर्षांचे होते, टिळकांनी समाधी बांधली हे खोटे”