आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त पुण्यात वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्यपालांना नको त्या ठिकाणी बोट घालायची सवय आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.(raj thakre statemnet on rajypaal bhagat singh koshyari)
मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना झाप झाप झापले.
या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, “तुम्हाला शिवराय आणि रामदास स्वामी समजतात का? ज्याबद्दल काही माहिती नाही त्याबद्दल का बोलता?तुम्हाला काही समज बिमज आहे का? राज्यपालांना नको तिथं बोट घालायची सवय आहे”, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांवर कुडमुडा ज्योतिषी अशी टिप्पणी केली.
सावित्रीबाईंवर केलेल्या विधानावरूनही राज ठाकरेंनी राज्यपालांवर टीका केली आहे. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, फुलेंच्या लग्नावर बोलत आहात तुमचं लग्न अजून झालं नाही. तेव्हा बालविवाह व्हायचे.” राज ठाकरे पुढे म्हणाले की, “रामदासांनी कधीच स्वताला शिवरायांचे गुरू म्हणवून घेतलं नाही. फक्त महापुरूषांना बदनाम करून माथी भडकवण्याचं काम चालू आहे.”
निवडणूकीवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की, मला सध्याच्या वातावरणात निवडणूकच दिसेना. ओबीसींचं कारण देत निवडणूका पुढे ढकलल्या. निवडणुका लांबणीवर पडणार नोव्हेंबरपासून सांगत होतो. मुळात लोकांना निवडणुकांमध्ये काहीच रस नाहीये. निवडणुका दिवाळीनंतर होतील असा दावाही राज ठाकरेंनी केला आहे.
तसेच राज ठाकरे पुढे म्हणाले की, “महापुरूषांना बदनाम करून मत मिळवण्याचा काहींचा डाव सुरू आहे. काय चाललंय राज्यामध्ये मला कळत नाही. सत्ताधारी म्हणतात आम्हाला संपवायचा निघाले, विरोधी म्हणतात आम्हाला संपवायला निघाले, मग उरलं कोण?”, अशी टीका राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि विरोधकांवर केली आहे.