Share

राज ठाकरेंचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल; म्हणाले, ‘ज्या मुंब्य्रात अतिरेकी सापडलेत…’

काही दिवसांपूर्वी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. ‘तुम्ही मशिदीवरील भोंगे नाही उतरवलेत तर आम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा सुरु करु’, असं विधान राज ठाकरे(Raj Thkare) यांनी केलं होतं. काँग्रेस, राष्ट्रवादी यांसह इतर पक्षांनी राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचा निषेध केला होता.(raj thakre statement on jitendra avhad)

महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी काल ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ‘उत्तर सभा’ घेतली होती. या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार भाषण करत महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे वाभाडे काढले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या सभेत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे.

“ज्या मुंब्य्रात अतिरेकी सापडलेत त्याच मतदारसंघातून आव्हाड निवडून येतात”, अशी घणाघाती टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सभेत यासंदर्भातील आकडेवारी सादर केली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर टीका करत असत असताना राज ठाकरेंनी जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला.

“राज ठाकरेंनी म्हणे सांगितल्याप्रमाणे कुठल्या मदरशांमध्ये वस्तरा जरी सापडला, तरी मी संन्यास घेईन. सापडेल कसा? दाढी करतच नाहीत. इकडून तिकडून तुला वस्तरा दिसला? यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते”, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे. ‘अतिरेकी सापडलेत त्याच मतदारसंघातून आव्हाड निवडून येतात’, असे देखील राज ठाकरे म्हणाले.

यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंब्य्रात दहशतवादी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईची यादीच सादर केली. यासंदर्भात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, “२४ ऑगस्ट २००१ सीमीच्या सहा हस्तकांना अटक, २० डिसेंबर २००१ अबू हमजा, १६ मार्च २०२० हिजबुल मुजाहिद्दीनच्या ४ अतिरेक्यांना अटक. २३ जानेवारी २००४ एक दहशतवादी जेरबंद”, अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सभेत दिली आहे.

“देशातल्या अनेक मदरशांमध्ये अशा असंख्य घटना चाललेल्या आहेत. अनेक पाकिस्तानी अतिरेकी, शस्त्रे सापडत आहेत. यात देशावर खरंच प्रेम करणारा मुसलमान भरडला जात आहे. सलीम मामा शेख यांच्या मतदारसंघात ९५ टक्के हिंदू लोक राहतात. पण सलीम निवडून येतात. याचे कारण हे मुसलमान देशावर प्रेम करणारे, प्रामाणिक राहणारे मुसलमान आहेत. देशात धर्माचा अतिरेक करणारे जे लोक आहेत, त्यांच्यामुळे हे मुसलमान भरडले जात आहेत, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
‘देशात लवकरात लवकर समान नागरी कायदा आणा’; राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी
वारंवार रंगरूप बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात वाढताहेत; जयंत पाटलांचा राज ठाकरेंवर पलटवार
‘केंद्र कोळसा देत नाही तर परदेशातून आणा’; महाराष्ट्रातल्या वीज टंचाईवरून दानवेंनी जबाबदारी झटकली

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now