मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असताना देखील मशिदींवरील भोंगे सुरु आहेत, असं विधान राज ठाकरे यांनी केलं होतं. पण मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने मशिदींवर भोंगे लावू नये असा कोणताही आदेश दिलेला नाही.(raj thakre give wrong information about supreme court decision about masque loudspeaker)
सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिक्षेपकाच्या आवाजाच्या तीव्रतेच्या संदर्भात आदेश दिला आहे. हा आदेश सर्व समुदायांना लागू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशासंदर्भात दिलेली माहिती चुकीची असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. त्यामुळे या वक्तव्यावरून राज ठाकरे स्वतः अडचणीत सापडले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करत राज्य सरकारने मशिदींवरील भोंगे ३ मे पर्यंत काढावेत, असं विधान राज ठाकरे यांनी ठाण्यातील जाहीर सभेत केलं होतं. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला दिला होता. पण मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने असा कोणताही आदेश दिलेला नाही.
सर्वोच्च न्यायालयाने १८ जुलै २००५ रोजी दिलेल्या आदेशात मशिदींवरील भोंगे काढण्याबाबत कोणताही आदेश दिलेला नाही. मशिदींवरील भोंग्यांबाबतचे प्रकरण ध्वनिप्रदूषणाशी निगडीत आहे. त्यामुळे हा आदेश देशातील सर्व समुदायाच्या लोकांना लागू आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ध्वनी तीव्रतेबाबत काही बंधने घातली आहेत.
शहरातील प्रत्येक ठिकाणी आवाजाची पातळी किती असावी, यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमावली तयार केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश मशिदींवरील भोंगे काढण्याबाबत नसून ध्वनीच्या तीव्रतेबाबत आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे राज्य सरकारने ३ मे पर्यंत काढावेत, असं विधान केलं होतं.
नाशिकमधील मनसे पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात पोलीस आयुक्तांना निवेदन देखील दिले होते. यानंतर नाशिक शहरातील सुन्नी मरकज सीरत कमिटीने देखील पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. अजाण देण्याची धार्मिक परंपरा आहे. या परंपरेचे पालन अनेक वर्षांपासून केले जात आहे. अजाण देण्याची परंपरा सुरु ठेवली जावी, अशी विनंती सुन्नी मरकज सीरत कमिटीने केली होती.
महत्वाच्या बातम्या :-
आजपासून बँकांच्या कामकाजात मोठा बदल, ‘ही’ असणार उघडण्याची आणि बंद होण्याची वेळ
शनिवारी पुण्याला येत असताना राज ठाकरेंनी हॉटेलमध्ये खाल्लं मटण? वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य
सदावर्ते कधीच मेंटेनन्स भरत नाहीत उलट दादागिरी करतात, बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या महिलेने केली पोलखोल