Share

महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’ – राज ठाकरे कडाडले

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यावरून राजकारण तापलं आहे. गुढीपाडवा मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढावेत, असं अल्टिमेटम राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलं आहे. भाजपने देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakare) यांच्या मशिदींवरील भोंग्याबाबतच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.(raj thakre conglatulate uttar pradesh cm yogi aditynath)

यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करणारे एक पत्रक सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्या पत्रकामध्ये उत्तर प्रदेशातील मशिदींवरील भोंगे हटवल्याबद्दल राज ठाकरेंनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत.

तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या पत्रकातून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर टीका देखील केली आहे. महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही फक्त सत्तेचे ‘भोगी’ आहेत, अशी खोचक टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. यावेळी महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो, असे देखील राज ठाकरे पत्रकात म्हणाले आहेत.

या पत्रकामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लिहिले आहे की, उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषतः मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’! महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.”

हे पत्रक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले होते. राज ठाकरेंनी भाषणात उत्तर प्रदेशात विकास होत असल्याचे सांगत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन केले होते.

आता पुन्हा एकदा पत्रक प्रसिद्ध करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी योगींचें कौतुक केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची महाराष्ट्रदिनी १ मे ला औरंगाबादमध्ये जाहीर सभा आहे. अद्याप या सभेला पोलिसांकडून परवानगी मिळाली नाही. मनसे पक्षाकडून या सभेसाठी जोरदार तयारी केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या :-
‘मुंबईतील शिवाजी पार्कवर नमाज पठण करू द्या’; औरंगाबादच्या वकिलाचे शिवसेनेला पत्र
थरकाप उडवणारे दृश्य! तरुण रक्तबंबाळ अवस्थेत मदत मागत होता, मात्र लोक व्हिडीओ काढण्यात व्यस्त होते..
भीमा कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी शरद पवार अडचणीत; चौकशी आयोगाने दिले ‘हे’ आदेश

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now