मुंबई | नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात “आयुक्त साहेब वेळ द्या’ अशी घोषणाबाजी करत गोंधळ घालणाऱ्या मनसेच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी या वेळी चोप देत, कार्यक्रमातून बाहेर काढल्याचा प्रकार घडला होता. वसईतील हा प्रकार गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.
तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करून शिवीगाळ करणारे पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांचे निलंबन करा, अशी मनसेनी केली आहे. गेल्या ६ महिन्यापासून पत्र व्यवहार आणि संपर्क साधूनही वसई-विरार पालिका आयुक्त वेळ देत नसल्याने आंदोलन केल्याचं मनसेकडून सांगण्यात आले.
याचदरम्यान पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दोन कार्यकर्त्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांची विचारपूस करुन ज्या गालावर पोलिसांनी मारलं, त्याच गालावर प्रेमाचा हात फिरवल्याचे मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी यांनी ट्वीट करत सांगितले.
पोलिसांनी सरकारचे दलाल असल्यासारखं वागू नये…
‘आमचे दोन महाराष्ट्र सैनिक कार्यक्रमात आयुक्त भेट देत नाहीत त्यांनी आम्हाला भेट द्यावी यासाठी कार्यक्रमात आंदोलन करत होते. त्यानंतर त्यांच्यावर हात उचलणारे पोलिसही आम्ही पाहिले. ते पोलीस आमच्या महाराष्ट्र सैनिकांना आई-बहिणीवरून शिव्या देत होते. पोलिसांनी सरकारचे दलाल असल्यासारखं वागू नये,’ असं संदीप देशपांडे यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
उदयनराजे केंद्रीय मंत्री होणार? राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण
पाच बालकांना उचलून धगधगत्या आगीतून धावली होती शूर परिचारिका; काय घडलं होतं ‘त्या’ रात्री?
‘डोनाल्ड ट्रम्प यांना स्वतःला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नाही’