मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात जाहीर सभा झाली. पुण्यातील गणेश कला क्रीडा संकुलात ही सभा पार पडली. या सभेसाठी पुण्यातील मनसे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakare) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.(raj thakare statement on uddhav thakare)
“औरंगाबाद शहराचं नामांतर झालं, असे मुख्यमंत्री त्या दिवशी बोलले. अरे पण तू कोण आहेस?”, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. “औरंगाबाद शहरात बघता बघता एमआयएमचा खासदार झाला. त्यांनी औरंगाबाद शहरात एमआयएम पक्षाला वाढवलं”, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातील सभेत म्हणाले आहेत.
यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील हल्लाबोल केला. “शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटतो का?” असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी एमआयएम पक्षाचे अध्यक्ष अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले होते.
यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आलेल्या औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन काही लोक घेत आहेत, तरी महाराष्ट्र थंड आहे. औरंगजेबाच्या कबरीसाठी फंडिंग सुरु आहे तरी महाराष्ट्र शांत आहे”, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातील सभेत म्हणाले आहेत.
यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबतच्या आंदोलनावर देखील भाष्य केलं. “आंदोलनानंतर ९० ते ९५ टक्के मशिदींवरील सकाळची अजाण बंद झाली. तसेच मशिदींवरील भोंग्यांचे आवाज देखील कमी झाले. पण फक्त आवाज कमी होऊन चालणार नाही, मशीदींवरील भोंगेच उतरवले पाहिजेत”, असे राज ठाकरे सभेत म्हणाले.
“आपलं हिंदुत्व अनेकांना झोंबलं आहे. शिवसेनेला एवढी देखील अक्कल नाही की ते कोणाबरोबर राहतायत”, असे राज ठाकरे सभेत म्हणाले आहेत. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. खरं हिंदुत्व काय? खोटं हिंदुत्व काय? अरे कपडे धुवायची पावडर विकताय का? असा सवाल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
प्रचंड सेक्स ऍडिक्ट झाला होता ऑस्करविजेता अभिनेता, गर्लफ्रेंडला तृप्त करण्यासाठी केली होती हद्द पार
मातोश्री बंगला काय मशीद आहे का? राज ठाकरेंनी शेलक्या शब्दांत राणा दाम्पत्याला झापले
बाळासाहेबांची शिवसेना आहे की पवारप्रेरितांची? म्हणाणाऱ्या पाटलांना शरद पवारांनी लगावला टोला, म्हणाले…