राज ठाकरेंचे श्वान प्रेम पुन्हा आले चर्चेत, लाडक्या श्वानांसोबतचा नव्या घरातील फोटो व्हायरल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे श्वान प्रेम प्रत्येकालाच माहिती आहे. राज ठाकरे यांचे त्यांच्या पाळीव श्वानांबरोबरचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा त्यांचे श्वानांवरचे प्रेम दिसून आले आहे.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी नव्या घरात प्रवेश केला आहे. तेव्हापासून राज ठाकरेंचे घर चर्चेत आले आहे. पण आता त्यांचे घरच नाही, तर श्वानही चर्चेत आले आहे. राज ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे नवीन घरात श्वावांसोबत मजा करतानाचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये राज ठाकरे आणि अमित ठाकरे श्वानांसोबत दिसून येत आहे. श्वानांसोबत मज्जा करताना हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी तो तुफान आवडला आहे. फोटोत दिसत असणाऱ्या श्वानांची नावे मुफासा आणि ब्लू अशी आहे.

राज ठाकरे यांच्या घरात अनेक प्रकारचे श्वान आहेत. विशेष म्हणजे या श्वानांबरोबरच त्यांच्याकडे तीन पग जातीचे श्वानही आहे. ग्रेट डेन प्रजातीचा जेम्स सर्वांच्या ओळखीचा होता. तो अनेक वर्षांपासून राज ठाकरे यांच्यासोबत राहत होता. पण काही महिन्यांपूर्वीच त्याचे निधन झाले आहे.

जेम्सच्या निधनानंतर संपुर्ण ठाकरे कुटुंब भावूक झाले होते. जेम्सच्या निधनानंतर राज ठाकरे भावूक झालेले दिसून आले होते. कुटुंबाकडून जेम्सच्या अंत्ययात्रेसाठी हार, फुलं आणि शाल वाहून त्याला अखेरचा निरोप देण्यात आला होता.

दरम्यान, राज ठाकरे यांचे श्वानप्रेमाचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. राज ठाकरेंप्रमाणेच त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांचेही श्वानांवर खुप प्रेम आहे. अमित ठाकरे यांच्याकडे मुफासा आणि ब्लु नावाचे दोन श्वान आहे.

महत्वाच्या बातम्या-
पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; स्वच्छ शहरांच्या यादीत मिळवला देशात पाचवा नंबर
कुणाचेही धर्मपरीवर्तन करणे हा आमचा उद्देश नाही; आम्हाला फक्त…; मोहन भागवतांचे वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! तुषार, ठिबक सिंचनावर आता मिळणार ७५ ते ८० टक्के अनुदान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.