Share

राज ठाकरेंची पुण्यातील सभा अचानक रद्द, तातडीने मुंबईला रवाना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सभा रद्द झाली आहे. यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील सभेनंतर राज ठाकरे(Raj Thakare) यांची पुण्यात सभा होणार असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते. पण आता सभा रद्द झाल्यामुळे पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.(Raj Thackeray’s sabha in Pune canceled)

मिळालेल्या माहितीनुसार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील नदीपात्रात २१ मे रोजी जाहीर सभा होणार होती. या सभेसाठी मनसे पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येत होती. मनसे पदाधिकाऱ्यांनी या सभेसाठी पुणे पोलिसांकडे परवानगी देखील मागितली होती. पण आता पावसाच्या कारणास्तव ही सभा रद्द करण्यात आली आहे.

पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील पत्र डेक्कन पोलिसांना दिले आहे. सभा रद्द झाल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपला पुणे दौरा अर्धवट सोडावा लागला आहे. सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात दाखल झाले होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुमारे ५० हजारांच्या पुस्तकांची खरेदी केली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात फिरताना दिसले. यावेळी माध्यमांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे संतापले होते.

“आम्हाला जगू देणार का नाही?” असा प्रश्न राज ठाकरे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना विचारला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये पक्षाच्या पुढील कार्यक्रमांबाबत चर्चा झाली. गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यावर घेतलेल्या आक्रमक भूमिकेवरून राज ठाकरे चर्चेत आले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला तीव्र विरोध दर्शवला आहे.राज ठाकरे यांना अयोध्येत प्रवेश दिला जाणार नाही, असे वक्तव्य भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-
४५० मातीच्या भांड्यांचा वापर करून तयार केले छत, उन्हाळ्यातही एसीची गरज भासत नाही
दिघेंच्या भूमिकेसाठी प्रसाद ओक नाही, तर ‘हा’ अभिनेता होता तरडेंच्या नजरेत, पण त्याने दिला साफ नकार; कारण…
PHOTO: शरमन जोशीची पत्नी आहे ‘या’ खतरनाक खलनायकाची मुलगी, नाव वाचून आश्चर्य वाटेल

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now