कालच्या बैठकीत उद्धव ठाकरेंशी राज ठाकरे काय बोलले? स्वत: राज ठाकरेंनीच केलं जाहीर

मुंबई : राज्यात झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्यात येणार आहे. त्यामुळे, पहिली ते आठवीपर्यंतचे सर्वच विद्यार्थी परीक्षेशिवायच पास होऊन पुढील वर्गात गेले आहेत.

मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यात पुन्हा कडक निर्बंध लावल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे काय असा प्रश्न पालकांसह विद्यार्थ्यांनाही पडला आहे. अशातच १० वी अन् १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास करा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

ते याबाबत पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना प्रमोट करावं, निर्बंधांच्या काळातील वीज बिल माफ करा, शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा, अशा अनेक सूचना राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना केल्या आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत नेमकी काय चर्चा झाली याचा खुलासा राज ठाकरे यांनी केला आहे. “काल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता आणि लॉकडाउनसंदर्भात भेटण्याची विनंती केली होती. पण त्यांच्या आजुबाजूला अनेक लोक करोनाने पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे तेदेखील क्वारंटाइन झाले आहेत, असे ते म्हणाले.

त्यामुळे झूमवर बोलता येतील असं सांगितलं. आम्ही दोघेच असल्याने आमच्यात काय संभाषण झालं आणि मी काय सूचना केल्या हे जनतेपर्यंत आलं नसतं. त्यामुळे ही पत्रकार परिषद घेत आहे,” असेही राज ठाकरेंनी यावेळी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या 

बाबा… तुम्ही लवकर घरी या! नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या कोब्रा कमांडोच्या निरागस मुलीची आर्त हाक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बैठक; लॉकडाऊनवर महत्त्वाची चर्चा

अजब उपवास! २ महिने फक्त बिअर प्यायला आणि घटवलं १८ किलो वजन, आता म्हणतोय..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.